
हो आम्ही लिहील पाहीजे.....
"माझी आई फाटक्या गोधड्या शिवते" वगैरे वगैरे.(त्याची आई रोज ब्युटी पार्लर मध्ये जात असली तरिही...)
हो आम्ही लिहील पाहीजे सिगारेट ओढून व्यसनमुक्तीच्या कविता......
आम्ही लिहीलच पाहीजे शेतकरी प्रश्नावर ऑफीसच्या मधल्या सुट्टीत एसीच्या रूममध्ये लंच करताना...
आम्ही लिहील पाहीजे निर्भयावर, रस्त्यावर येता जाता बाईच्या मांड्या बघत असलो तरिही...
आम्ही दाभोळकरावर, पानसरेवर, कलबुर्गीवर अगदी हिंदू मुस्लीम सलोख्यावरही..
जरी हिरवा रंग बघीतल्यावर तोंडात शिवी येत असली तरिही.....
आमच लिखाण गरजेचच आहे....
प्रत्येकाला अधिकार भेटलाय लिहायचा व्यक्त होण्याचा....
स्पर्धा झाल्याच पाहीजेत बळीराजा,पुरोगामी हत्या या विषयावर....
तेव्हा कुठे सुचेल आम्हाला कविता....
आम्ही शब्द जुळवू....
अतिशयोक्ती करू...
अगदी शिव्यादेखील देऊ तेव्हा कुठे कविता रंगात येईल...
कविता लिहायची थोडी असते रंगवायची असते हे आत्त्ता कुठे समजू लागलय.
वर्तमानपत्रात कविता आलीच पाहीजे, जरी शेवटी ती दुसर्या दिवशी लहान पोरांची संडास पुसायला वापरली तरिही....(वर्तमानपत्रात कविता आल्यावर तुमची officially 'कवी' या पदी निवड होते म्हणे)
कारण माझ लिहीण गरजेच आहे...
माझ्या लिहीण्यान भरपूर फरक पडतो
कसा काय विचारता?
सन्मानचिन्ह भेटतात हो अगदी खर सन्मानचिन्ह भेटतात,कपाट भरतात...
प्रत्येक विषयाच वेगळ सन्मानचीन्ह....
आपण लिहीणं रंगवत जातो आणि कपाटात विचार डांबले जातात....
प्रत्येक सन्मानचिन्ह वाढत जाताना विचार घुसमटू लागतात कपाटात...
तरिही आम्ही लिहीलच पाहीजे आणि शेवटी "माझी दुष्काळावरची अतीशय गाजलेली कविता" असा उल्लेख देखील करावा तुमचा फोन नंबर, पत्ता, अगदी तुमचा बायोडाटा पण द्यावा(म्हणजे चारदोन शिव्या हासडता येतील फोन करून)
शेवटी काय हो कविता जगायची थोडीच असते लिहायची तर असते.....
मग वाहवत जायला काय हरकत आहे "मुंबईत बसून गावाकडच्या शेतीमातीवर".......
बघा काय करायचय नाहीतर
'अजून एक सन्मानचिन्हापुरती जागा नक्कीच असेल कपाटात आणि जाताना एकच प्रश्न "खरच कवितेचा गर्भपात करता येतो का...?"
मी शुभम