आठवतोय तो पाऊस त्या पावसाच्या धारा.
भिजलेल्या तुझ्या अंगाला झोंबणारा सोसाट्याचा वारा.

ती बोचरी थंडी तुझ्या सार्या अंगात मुरलेली....
तीनं समोरच पाहिल मी हातात छत्री धरलेली....

अलगद शरीर तोलत ती जवळ येता...
बोलली, "मला थोड्यावेळ तुमच्या छत्रीत घेता...?"

काळवेळ ओळखून मी ती छत्री तिच्या डोक्यावर धरली...
थोड खेटून उभ राहिल्यावर ती आम्हा दोघांनाही पुरलेली.....

विजेच्या भेदक आवाजाने तू अचानक माझ्या मिठीत शिरलेली....
काळवेळ ओळखून ती मिठी थोडी आवळूनच धरलेली....

पावसाच्या सरी मात्र अचानक सरून गेल्या.....
ओलावलेल्या ओण्या तीच्या छत्रीमध्येच मुरून गेल्या.....

पाऊस संपल्यावर ती मात्र छत्रीतून दुर झाली.....
थँक्स एवढेच शब्द बोलून पाखरासारखी भूर्रर झाली.....

मी ही आता पावसासंगे हल्ली अनामिक वाहतो....
खरच सांगतो तुझी आठवण येता
त्या छत्रीकडे पाहतो.......

              शुभम काकडे