"शुभम दादा तुझ्याकडे दुर्बिण आहे का रे?" कधी नव्हे ती माझ्याशी बोलणारी वैष्णवी दारात उभी होती. "नाही ग काय चंद्र बघण्यासाठी हवीये का?"
"नाही ग्रहण बघण्यासाठी"तेवढ्याच तत्परतेने तीन उत्तर दिल.बर दुर्बिण नव्हतीच पण  तीला ग्रहण कितपत समजल होत हे जाणून घेण्यासाठी मी घराबाहेर पडलो.सूर्यावर पडलेला लालसर प्रकाश पाहताना एखादी कविता करावी वाटून गेल पण आधीच हजारो कवींना आज हाच विषय भेटलेला असल्यामुळे मी माझ्या मनातले कविता करण्याचा विचार झटकून टाकला(हुशssवाचलो बाबबा)
थोडिशी गंमत म्हणून वैष्णवी काय करतीये ते पाहत होतो.एका हातात एक्स रे चा कागद पकडून ग्रहण दिसतय का ते बघण्याचा प्रयत्न ती करत होती. थोडी निराश होऊनच "काय यार,दिसत होत तेवढ पण दिसत नाहीये आता"
     मला हसू आल "पण तूला कोणी सांगितल,की आज एक्स रे मधून पाहील्यावर तूला ग्रहण स्पष्ट दिसणार आहे?आणि तसही लाल तर दिसतोय ना चंद्र मग झाल ना!"माझ एकूण घेतल्यावर ती थोडिशी गोंधळली "आम्ही प्राथमिक शाळेत तर असच बघायचो!" मला हसू आल.थोडासा मास्तरी आव आणून मी विचारू लागलो" बर ते जाऊंदे ग्रहण म्हणजे काय? सूर्य लाल होतो म्हणजे काय होत ? हे माहित असेलच ना तूला?"
ती थोडिशी लडिवाळपणा करत "गेल्यावर्षी होत आता नाही आठवत"
        यानंतर मी तिला पृथ्वी चंद्र आणि सूर्याची रचना सांगत गेलो आणि तिला प्रश्न पडू लागले "सावली कशी काय पडणार पृथ्वीची ?बर मग आजच कसा काय लाल दिसतोय एरवी तर प्रकाश असतोच ना त्याच्यावर ?हा आणखी एक, जर आपण पृथ्वीच्या एका बाजूवर राहतो मग पृथ्वी कलंडत का नाही बर?" मला हसायला आल होत पण खर सांगू आतून खुप वाईट वाटत होत.माध्यमिक शाळेत असताना दहावीत शिकताना देखिल असले प्रश्न आम्हाला पडायचे.त्यात वैष्णविची आणि आपली चूक नव्हतीच.आपल्या पाठ्यपुस्तकातच एवढी विद्वता भरली होती की काय सांगू? परिभ्रमण आणि परिक्रमणची व्याख्या पाठ झाली की आम्हाला भूगोलात पैकीच्या पैकी पडायचे पण आमची तर्क करायची,विचार करायची क्षमताच मारली जायची.
    किती साधी घटना ग्रहणाची आहे ना! दररोज सुर्य उगवतो मावळतो एवढा साधेपणा आहे या गोष्टीला....वेगळेपण म्हणायचच तर एक स्थित्यंतर आणि बदलत्या सृष्टीचा एक तुकडा आज अनुभवायला भेटणार होता एवढच. तसही  दैनंदिन कामकाजात बर्‍याच गोष्टी अनुभवायच्या राहूनच जातात उदा सूर्यास्ताच्या तांबूस क्षितीजाचा रंग, मनमोकळेपणे भरकटणारा वादळी वारा वगैरे वगैरे अनुभवायच राहूनच जातच. तो एक जगण्याचा सर्वसाधारण भाग बनून जातो.मग अशा वेळी ग्रहण बघण हे नक्कीच वेगळेपणाच वाटण तस स्वाभाविकच आहे...
       पण ग्रहणाच्या भितीने घरातच बसलेल्या आणि परंपरागत विचारांच्या ग्रहणाने झाकोळलेली माणसांची विद्वता आज प्रकर्शाने जाणवली.मुळात 'चंद्राला कुणितरी खातोय'या कल्पनेला माझा विरोध नाहीच मुळी ठिकय एवढतेवढ चालू शकतच (कवितरी दुसर काय करतात म्हणा)
पण ग्रहणात जेवण न करणे,मंदिरे बंद ठेवणे,देव पाण्यात ठेवणे,तुळशिची पाने पिठात टाकणे,ग्रहण संपल्यावर आंघोळ करणे हे जरा जास्तीचच वाटत.मला मान्य आहे की, ग्रहणाला शास्त्रीय कारण नक्कीच आहे ते ठीक आहे.पण चंद्रावर पोहचलेली माणस अजून असा बालिश विचार अजूनही करतायेत या गोष्टीच वाईट वाटत रहात ......
     सहावीच्या पुस्तकातल्या ग्रहण माहित नसणाऱ्या आणि एकूणच शिक्षण अशा ढकल गाडीतून पुढे चालत आलेल्या आपल्यासारख्या हजारो तरूणांच्या आयुष्याला लागलेल ग्रहण कधीच सुटू शकणार नाही..........
       थोडा बदल करण गरजेच आहे नक्कीच कवीमनाचा पांढराशुभ्र दुधाळ चंद्र तुमची वाट पाहतोय...........

                 शुभम काकडे