पक्षी उडत नसतात...
कधीच
कारण त्यांची घरटी झाडांवर
आणि झाडांची मुळ जमिनीत खोलवर रूतलेली असतात.....
झाडाच्या आणि आणि पाखराच्या जन्मापासून....
पाखर उडत नसतात कधीच
कारण
प्रवासाची सुरवात आणि शेवट झाडावरच होते शेवटी पिल्लांची भूक भागवून पंखात बळ भरण्यासाठीचा
प्रवास असतो तो....
पक्षी उडत नसताचच कधीच
कारण आभाळात ढग सााठतात
पण तहान भागविण्यासाठी पक्षी अजूनही जमिनीवरच येतो
कारण तहान आणि मृगजळ यातला फरक कळण्याइतपत शहाणपण
पाखरांना असत....
माणस इमारती बांधतात
यंत्राच्या मदतीने उडतही जातात
अगदी पाखरांसारखी...
अवकाशाच्या पोकळीत
गायबही होतात.
पण हल्ली माणसांचा आता मातीला स्पर्शही होत नाही.....
पाखर उडत नसली तरी ते घरट विसरत नाहीत....
माणस प्रवास करण्याच्या नादात घरटी विसरू लागलाय....
माणसाची काय चूक म्हणा
माणसांची मुळ मातीच्या गर्भाशयात कधीच पोहचली नाहीत.....
शुभम काकडे
