
प्रति,
राधिका सुभेदार उर्फ बिझनेस वुमन
मी तुम्हाला वहिनी म्हणणार नाही कारण गुरू माझा भाऊ लागत नाही . तसही तुला सगळेच वहिनी म्हणून हाक मारतात.याचा अर्थ तुझ अस्तित्व आणि नाती गुरूमुळेच तयार झालय बर का.मी.तुला आपल ताईच म्हणतो.तसही हल्ली तुलाही वेळ नसतोच.राधिका मसाला जोरात चाललाय म्हणे(सगळे काॅमप्युटरवरच बसवेले असतात मसाले कोण बनवत देव जाणे) आनंद,सौमित्र आणि गुरूनाथ तुम्ही एकाच काॅलेजमध्ये होता आणि सध्या सगळेच बिझनेसमध्ये आहात याचा अर्थ तुम्ही कदाचित एमबीए करत असाल.तरिही तुला इंग्रजी येत नव्हती आश्चर्य आहे बुवा!(तू मराठी माध्यमातून शिकली असशील हरकत नाही)
आता म्हणशील माझ्या पर्सनल आयुष्याशी तुला काय पडलय?तर नीट बघ सिरीयलमध्ये कुणाला त्यांच्या आयुष्याच पडलच नाही.सगळेच तुझा विचार करत असतात.लग्न करण्याच्या वयात नवीन मुलगी शोधण्याऐवजी आनंद भावजी तुझ्याच आयुष्यात लुडबुड करीत असतो.कंपनीचा डायरेक्टर असणार्या आणि व्हाया अमेरिकेतून आलेल्रा सौमित्रने तर कंपनी आणि कामकाज वार्यावार टाकून तुझ्या आजूबाजूला पिंगा घालायला सुरवात केली.पानवलकराचे केस पिकले तरी स्वतःच्या नातवंडांन खेळवायच सोडून तुझ्याच संसाराची चिंता करत असतात.कामाशी काम ठेवणारी आणि हातावर पोट असणारी बकुळा मावशी दोन घरची भांडी न घासता गुरूनाथ विरूद्धच्या कटकारस्थानात सहभाग घेते(कदाचित एस्ट्रा पैसे मिळत असतील).तुझा दादा आणि वहिनी तर विचारूच नको.
उदा:-"माझ्या बालीच्या(पालीचा गणपती ऐकल होत हे बाली काय?) आयुष्यात ढवळाढवळ करायची नाय सांगून ठेवतो"
ऐवढ बोलूनही वहिनीच आपल चालूच असत.पर्सनल आयुष्यात एखाद्याला ऐवढी लुडबुड करू देऊ नये तायडे......
बरं शनाया तुला गुड फाॅर नथिंग म्हणते म्हणजे बघ ना सगळ काम तर तूच करतेस हीच आपल बसून पिज्जा बर्गर ब्युटी पार्लर चालूच असत.शेवटी गुरू तीला बच्चा म्हणतो ते काही उगाच नाही तिची एवढी अल्पबुद्धी आहे की "बच्चा" म्हणजे प्रेम वगैरे काही नाही तर तीला खिजवण्यासाठी ते आपल चालू असत हे तुला समजेल.
गुरू रोज शनाया सोबत राहतो झोपतो पण याच कुणालाच अगदी प्रेक्षकांनाही काय वाटत नाही.प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या पुरूषासोबत परस्त्री बोलली तरी चर्चा उठवणार्या बायका मात्र शनायाच्या बाबतीत किती न्युट्रल असतात?? आणि आमच्या मैत्रिणी तुमच्या स्टोरीसाठी नाही,तर शनायाच्या ड्रेस आणि लुकिंगच्या नविन टीप्स मिळतील यासाठी सिरीयल पाहतात.माझी एक लहान बहीण तर शनायाला रोल माॅडेल मानते.गुरूनाथसारख्या नवर्याच्या कानाखाली वाजवायची सोडून आपल गिळमिळा संसार करण्यात काय तथ्थ आहे सांग पाहू.तू तेवढी खंबीर आहेसच.शनायाच काहीच चुकत नाही एखाद्याचा स्वभावगुणदोष असू शकतो त्याला तू तरी काय करणार त्यापेक्षा गुरूला धडा शिकव..........
इंग्रजी छान बोलतीयेस छान वाटत पण मराठीच गोडवा कमी करू नको.तूझ्या तोंडूध नागपुरी ऐकायला आवडत.जमलच तर भाऊबीजेच्या आधीच ऐईन चकल्या आणि चिवडा करायला तुझा मसाला यावर्षी वापरावा म्हणतो .जमलच तर ऑर्डरपण देईन आणि तुझी सिरीयल बघता बघताच जर मसाल्याचे पॅकेट बनवण्याच काम आमच्या घरगुती बायकांना भेटल तर बघ,तेवढाच त्यांच्याही संसारात हातभार लागेल.
शेवटी जाताना पुरी भाजी मसाला,पनीर मसाला,सांबर मसाल्याच्या पुड्या मधूनअधून सिरीयलमध्ये दाखवत चला म्हणजे किमान तुझी मसाल्याची कंपनी आहे यावर आम्हीतरी साशंक राहू
कळावे
तुझा
शुभम काकडे