कॅन्टीनला आम्ही पोरांच्या लफड्याविशयी बोलायचो,तर हा चीनच्या मुद्याला हात घालायचा.मनात नसल तरी ऐकू वाटायच कारण इतिहासाच्या मास्तरापेक्षा तरी चांगलच शिकवायचा.
एकदा तर भटकायला कुठेतरी जायच म्हणून मिटींग जमलेली आणि आमच्या महाशयांनी सामाजीक शिबीराला जायचा प्रस्ताव समोर ठेवला.आईशप्पथ एवढ्या शिव्या खाल्या असतील त्याने काय सांगू.
लेक्चर बुडवून पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटायचा सोडून हा बावळट पुस्तक वाचत बसायचा.
नेहमीच काय स्वतःची अक्कल चालवून स्वतः कस इतरांपेक्षा वेगळ आहे अस भासवून द्यायचा.....
"कधीतरी पुस्तक वाजण्यापेक्षा माणसं वाचावीत" असा एकदा उगाचच कुठूनतरी डायलाॅग टाकला तर अर्धा तास लेक्चर झाडायचा.आवडायच मला सगळ पण मनमोकळ जगण्याच्या व्याख्या आमच्या वेगवेगळ्या असतील.???
शेवटी मन घट्ट करून बोलले
"आपले रस्ते वेगळे आहेत.तुझ्या पाऊलवाटेत माझ्या पायांचे ठसेच उमटत नाहीत रे"मला वाटल रडेल बिचारा पण हा बावळट मोठ्यामोठ्याने हसू लागला."का हसतोयस?"विचारल तर म्हणाला
"बघ किती अलंकारीक बोललीस.अगदी पुस्तकी भाषेसारख"
मला रागच आला होता पण शेवटी तो थोड थांबून अगदी डोळ्यात बघत बोलू लागला
"आता माझ्या पाऊलवाटेवर
पाऊस रेंगाळतोय
ओल्या जमिनीवर
तुझ्या पायांचे ठसे नक्कीच
उमटतील........"
मला हसू आल.एक जगावेगळा अवलीया सोबत असल्याच समाधान भेटल.त्याझ्या मिठीत शिरले ती मग कायमचीच......
आता तो मनसोक्त भटकतो,मनमोकळ हसतो,जगण्याचा आनंद घेतो.मलाही पुस्तक वाचाविशी वाटत,सगळ समजून घ्याव वाटत........
शेवटी पाऊलवाटेवर बरीच रूळली आहे मागे वळून पाहील तर भूतकाळातील पायांचे असंख्य ठसे अगदी स्पष्ट उठलेत कधीच पुसता न येणारे............
शुभम काकडे
