कानातल हेडफोन काढलं पाहीजे......

             

मागील महिन्यात जवळ जवळ सहा वेळा मुंबईची वारी झाली पण यावेळेस ठरवल होत की कानात हेडफोन टाकून टाईमपास करण म्हणजे प्रवास नसतो....
नेहमीसारख पुस्तक वाचत बसायच का?असाही विचार मनात येऊन गेला.
शेवटी 'प्रवास'म्हणजे अनौपचारिक शिक्षणच असत.ज्या ठिकाणी भरपूर काही शिकायला भेटत तुम्ही समृद्ध बनता.
     तर स्टेशनवर बसलेली शेकडो माणस संवाद साधत असतात.जवळच बसलेली एक आज्जी स्वतःशीच बोलत होती मला अगदी वेडसर वाटल पण आपला मुलगा आणि सून यांना शिव्या घालत होती.
आजूबाजूला पाहील तर काकडी,अंजीर,पेरू विकायला हातात टोपल्या घेऊन रेंगाळलेली माणस,वडापावच्या गाड्यावर हाताने माशा हटकणारी माणस ?भरतीसाठी मुंबईला जाण्यासाठी डझनभर पोर एक्सप्रेसची वाट पाहत होते.
     एकदाची गाडी आली.तिकीट कन्फर्म झाल असल तरी उगाच आपल्या शिटवर एखादा जाडाभरडा माणूस बसला असेल तर त्याला कस उठवायच?आपल्या अंगावर धावून आला तर काय करायच? विंडोसीटजवळ एखादी बाई बसली असेल तर तीला उठवायच का? असे फुकटचे बाश्कळ शंका मनात येऊन गेल्या. माझ्याजवळ अगदीच किडमुड्या (म्हणजे माझ्यासारखाच😂) वयान अगदीच लहान वाटणारा काॅलेजच पोर बसल होत.चार्जींगची पीन मोबाईलला आणि मोबाईलची काॅड कानात टाकून हा अवलीया जवळजवळ सीटवर झोपलाच होता.हळूच मोबाईलमध्ये डोकावून पाहील (माझ्या नाही त्याच्या) तर प्रथमदर्शनी "मला आमदार झाल्यासारख वाटतय"गाण्यावरचा नृत्याविष्कार पाहत बसला होता आणि गालातल्या गालात हसत होता(ते खुपच  बालीशपणासारख वाटत होत)
     मीसुद्धा नेहमीसारखच हेडफोन टाकून टाईमपास करायचा की सोबत वागवलेल पुस्तक चाळत बसायच या संभ्रमात होतो शेवटी ठरवल आता फक्त निरीक्षण करायच (बसस्टाॅपवर,काॅलेजकटट्यावर वगैरे वगैरे चाललेल निरिक्षण वेगळ)
तर माणस काय बोलतायेत,खिडकीपलीकडून काय दिसतय,फेरीवाले विकताना कोणते कोटेशन वापरतायेत अगदी सगळ नीट पाहू लागलो.तेवढ्यातच विंडो सीट कन्फर्म केलेला तिसरा व्यक्ती पुढच्या स्टेशनवर चढला आणि तिकीट दाखवून खिडकीजवळ बसला.हेडफोन कानात टाकून आपल्या गुलाबजाम सोबत बोलू लागला (तीच नाव प्रणिता होत) शेवटी अगदी कुजबुजल्यासारख बोलत वेगळेच आवाज काढू लागला (जादा स्पष्टीकरण नको)
असो यानंतर डाव्या बाजूला बसलेल्या पोरान स्वतःहून विचारल.
                शुभम काकडे

"दादा आपण जाॅब वगैरा करता का?"
( काही क्षणापुरता खिडकीतून उडी टाकून जीव द्यावा अस विचार मनात येऊन गेला )
"नाही मी आत्ता फस्ट इअरला आहे तू काय करतोस"
     "मी बँकेत मॅनेजर आहे.सध्या सांताक्रुझला असतो"
(आता खरच उडी टाकावी अस वाटल)
  "अरे वा! छानच की.पण तसे खुप लहान वाटता तुम्ही"
      "हो ना...काय करणार उंचीच नाही वाढली (ठेंगण😂)पण मघापासून खुप बोअर होतय म्हणून थोडा टाईमपास करतोय"
            "हा तेही खरच आहे"मी सुरात सुर मिसळला...
"बरं तुम्हाला फिल्म वगैरा देऊ का म्हणजे जाईपर्यंत टाईमपास होईल"
         
     यानंतर शांत होऊन मी त्याला मघापासून निरिक्षण करत असल्याचे सांगितले आणि यात किती मज्जा येते याची काही उदाहरण दिली.
    "अरे वा मस्त बर चल आपण दोघे बघुयात काय काय दिसतय ते"
      पुढे आम्ही दोघे एक एक प्रसंग वेचू लागलो.
अगदी
रास्ते का टाईमपास अस म्हणत चकणा विकणारी बाई,
ठंडा ठंडा कुल कुल म्हणत फिरणारी लस्सी,
उकाड्यातही चहा आणि काॅफी पिणारे मुंबईकर,
डोळ गमावलेली सुरेख आवाजात गाणारी माणस,
लोणावळा घाट उतरल्यावर दिसणारी गाव,
लाकड गोळा करण्यासाठी जंगलात भटकणारी ठाकरी जमात,
स्टेशनवर हातात हात घेऊन बसलेली जोडपी,
कर्जतचा प्रसिद्ध असणारा वडापाव,(पाव अगदी १९ व्या शतकातला होता)
मुंबईत घुसताना हळूहळू जाणवणारा उकाडा,
कल्याणच्या आधीच्या पटट्यात सुटणारा भयाण वास,
स्टेशनच्या अगदी बाजूला विखुरलेली झोपडपट्टी,
प्लॅटफॉर्म वर लोकलसाठी ताटकाळणारे मुंबईकर.....
             आणि यासोबत
शिक्षण,स्पर्धा परिक्षा,वाचन, बँकेतील अनुभव अगदी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंच्या बाॅल घासण्याच्या प्रकरणापासून ते रघुराम राजन याच्या हुशारीबद्धलचे किस्से आणि माहिती एकमेकांसोबत शेअर केली.......
      शेवटी कधी स्टाॅप आला समजलच नाही.त्यान मोबाईल नंबर घेतला आणि पुस्तक वाचण्याच प्राॅमिससुद्धा केल आणि हसत हसत निघून गेला.....
मी मात्र पुस्तक तसच मिटून ठेवल
गेल्या काही तासांत मी खरच किती पुस्तक चाळली असतील..........
प्रवास अस भरभरून देतो फक्त कानातल हेडफोन काढून
 जगल पाहीजे......
      बोलल पाहीजे......