उंदरायण



    "अहो एकलत का?"
उंदरीण जरा रागवलीच होती यांच्या अहो वर.....
"काय ग बोक्या आला का?"उंदराच्या चेहर्‍यावर चिंतेचे भाव
(बायकोच्या डोळ्यात पाणी दाटून आलेले.हंबरडा फुटतानाच्या परमोच्च क्षणापर्यंत तीन हुंदका दाबून ठेवला होता)
       "अग सांगणार आहेस की नाही"
(सुस्कारा सोडत)
   "गेले आज्जी काका पुतण्या भाऊ आई बहीण सगळे सगळे गेले"
   (उंदीर मिश्कील मिशीत हसला)
"कुठे अमेरिकेला गेले का?
   (नवर्याच्या या फालतू विनोदावर त्याच्या कानाखाली भिरकावून द्यावी अस उंदरीण ला वाटल)
"माझ नशिबच फुटक.तुमच्याबर बापान संसार थाटून दिला आणि तो गेला मला सोडून"
  (उंदरीण धुसमूसू लागली)
"म्हणजे गचकले की काय?कस झाल?कुठे?"
(बायको सावरत)
"त्या पुंगीवाल्यानच पुंगी वाजवली बघा.तीन लाख भावकी(उंदर)मारली.आपली सगळी भावकी मेली धनी!........"
"काय?"......
उंदराला काय कराव सुचेना.
त्याच्या अंगावर (साॅरी मिशीवर) काटा उभा राहीला.
   "हा पण एवढी भावकी मारण म्हणजे काय खेळ हाय का.तुझ्याच कानावर चुकीच पडल असेल"
उंदरान शंकेला पुष्टी दिली......
    "आपला इतीहास तसा लई जूना हाय टाॅमच थोबाड लालेलाल केलय,सरकारी कागद कुरतडणे तर आपला जन्मसिद्ध हक्क, सरकारचा आर्धा गहू कष्ट न करता फस्त केलेल्या कित्येक मोहिमा आजतागायत सुरू आहेत आपल्या पलटणींकडून, एकवेळ निरव मुदी सापडू शकतो पण आपल्या भावकीचा थांगपत्ता नाही लागणार ह्यांना"
          बायकून बोटांचा खवडा करून नवर्याच्या टाळक्यात मारला(उंदरांच्यात पितृसत्ताक वगैरे काय नसत)
     "अहो पण बोक्यांच अधीवेशन भरलय मुंबईत,त्यांच्याच गोट्यातून खबरबात आलीये आणि कागदी पुरावा पण हाय म्हणत्यात"
       (उंदराला बायकूच्या अल्पबुद्धीवर हसाव का रडाव तेच कळेना")
    "कागद खर बोलत्यात हुय आणि मंत्रालयातली कागद म्हणजी विचारूच नको"
    (ऊंदीर गालातल्या गालात हसला)
"हा पण बातमी खरी असू शकते ना म्हणजी शक्यता आहेच की?"

      उंदीर बायकूवर वैतागला
     "तुला असम्हणायच का आपली दोन लाखाची पलटन मंत्रालयात पिकनीक स्पाॅटला गेली हूती आणि सात वर्षात एवढी उंदर मारता आली नाय एवढी सात दिवसात मारली!कस शक्य हाय बुवा"
     (उंरणीच्या कपाळावर आठ्या पडल्या)
"मग तुमच काय म्हणण काय यावर"
      (उंदराला मंत्रीबिंत्री झाल्यासारखा फील आला)
"थोड सविस्तर सांगतो म्हणजे बघ बोक्यांना मंत्रालयात तसही काही काम नसत.फुकटच कॅन्टीनच स्वस्त खाऊन उंदीराला पकडून घ्यायच कष्ट ते कशाला करतील?
  आणि तीन लाख उंदरांना मारल म्हणे!(आता कस मुद्दा सापडला) तीन लाख उंदर मंत्रालयात तरी मावतील का ?"
(बायकूच्या डोक्यात लख्खकण प्रकाश पडला)
"अवो हे तर माझ्या ध्यानातच आल नाही आणि मला खात्रीये मंत्रालयातली कागद खाल्ल्याबिगार आपली पलटन परत यायची नाय बघा"
उंदराला पलटनीचा अभिमान वाटला.बायकूच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटल
"अहो धनी पण ती बोक्यांची सभा???"
उंदरान मिशीवर ताव मारला
"अग बोक्यांच्या माकडचाळ्यांवर लक्ष द्यायच नसत"
  (याला शब्दांची  अतीशयोक्ती म्हणतात जशी बोक्यांच्या सभेत झाली असो)
     "मंत्रालयावर उंदरांचच राज्य आहे आणि उंदरांचच असणार......"
   बायकू घरदार गमावून बसल्याच्या दुःखतून सावरली.उंदरान थाटात विचारल
"अग जेवायला काय केलय?"
बायकून लाडान सांगितल,
   "अहो पंकजाताईन चिक्की आणलीये तीच वाढते"
उंदराच्या तोंडाला पाणी सुटल.
उंदराउंदरीन हसत हसत
       चिक्कीवर ताव मारला.......
                    शुभम काकडे