आपुल्या घरात हाल सोसते मराठी

आपुल्या घरात हाल 
             सोसते मराठी



            मराठी भाषेचा एकदिवसीय पुळका आलेल्या आणि समाजमाध्यमांवर स्टेटस व पोस्टच्या माध्यमातून मातृभाषाप्रेम जागृत झालेल्या सर्व मराठी जनाच्या मनातून मराठीच भूत एव्हाना उतरलेल असेल हे ठाऊक असल्यामुळे पुढील आख्यान सांगण्याचा प्रयत्न........
         सर्व काही आलबेल असलेली गोष्ट लोकांच्या कधीच गळी उतरत नाही त्यासाठी गोष्टीत काहीतरी खोट असावी लागते (जस की पौष्टीक वरण भात ऐवजी पाणीपुरी हवीहवीशी वाटते अगदी तस).मराठी कवितेच्या पुस्तकात सुगीचे (साॅरी शिमग्याचे ) दिवस आलेले असताना आणि रस्त्याने चालताना एखादा खडा मारला तरी तो नेमका कोण्यातरी कविला लागतो अस सर्वसाधारण विधान करणार्या आपणास कवी  हा प्रकार म्हणजे नेभळट,भावनिक तसेच कामाधंदा नसलेल्यांची काम असच वाटत आलेल आहे.फार फार तर "प्रेम म्हणजे प्रेम असत" आणि "ओळखलत का सर मला" या कवितांच्या पुढच्या ओळीही माहित नसणारे काव्यरसिक या मातीत असताना सुरेश भट नावाच्या अद्वितीय आसामीच्या काही काव्यओळींचे समिक्षण करण्याची लाट महाराष्ट्रात उफाळून आली आहे.
              काल सगळीकडे मराठी मातृभाषा दिन उत्साहात पार पडत असताना राज्यपालांच्या अभिभाषणानाचे मराठीत भाषांतर न झाल्यामुळे "सरकारने मराठी भाषेचा खून केला आहे"असे विधान करणार्या विरोधकांची पोर international English medium school मध्ये शिक्षण घेत आहेत हे आपण सर्वजण जाणताच तसेच पोटतीडकीने "या घटनेची आम्ही निंदा करतो वाटलच तर समस्त मराठी जनतेची मी माफी मागतो"असे हस्तीनापुरात देवादी देव इंद्र यांनीही विधान केले असले तरी ते किती धुतल्या तांदळातले आहेत हे आपण सर्वजण जाणताच. सो मग मोक्षप्राप्तीसाठी आपल्या सरकारचे भाषाप्रेम अभिव्यक्त करण्यासाठी विधानसभेच्या कामकाजाची सुरवात मराठी अभिमानगीताच्या सादरिकरणापासून झाली.देवादी देवांच्या चेहर्‍यावर गर्वाचे हसू फुललले असतानाच अचानक माईक सिस्टीम (साॅरी ध्वनीयंत्रणा) कोलमडून पडली तेव्हा अचानकच विरोधी पक्ष नेत्यांना मराठी भाषेवर अन्याय झाल्याचा साक्षात्कार झाला.
                 गोष्ट एवढ्यावरच थांबली असती तर थोडे मात्र काही नेत्यांनी सुरेश भट यांच्या गीतातील शेवटचे कडवे सत्ताधाऱ्यांनी वगळल्याचे निदर्शनात आणले(बापरे म्हणजे मराठी समिक्षणाला चांगले दिवस आलेत तर)
यावर देवादी देवांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आणि या ओळी सुरेश भटांनी तुमच्या सरकारच्या कार्यकाळात लिहल्या असल्याचे स्पष्ट केले की जेव्हा मराठीवर खरच अन्याय होत होता.असो यावर भाष्य करताना सुरेश भटांनी या ओळी स्वतः वगळल्याचे काही जाणकार सांगत असले तरी "सुरेश भट"यांच्या कवितेवरूनही राजकारण चालू शकते हे आपल्याला काही दिवसांतून जाणवले.याचाच अर्थ मराठी कवितेला मात्र नक्कीच अच्छे दिन आले आहेत हे मात्र शाश्वत सत्य......
          शेवटी निरूपणाच्या ओळी सादर करताना एवढेच सांगू इच्छीतो की सुरेश भटांनी आत्ता हा सारा वाद पाहिला असता तर नक्कीच त्या ओळी या अभिमान गीतात सातव्या कडव्यातल्या या ओळी पुनश्चः एकदा घुसवल्या असत्या कारण एकूनच वादावर पडदा टाकण्यासाठी या ओळीच पुष्कळ आहेत.......

    पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
   आपुल्या घरात हाल सोसते मराठी
    हे असे कित्येक खेळ पाहते मराठी
    शेवटी मदान्द तख्त फोडते मराठी........

                   शुभम काकडे