
सावित्री आज तुझा जन्मदिवस.तुझ्यासारख्या शेकडो महिलांना शिकता यावं म्हणून तू लढा दिलास.नवर्याशी नजरानजर करण शक्य नव्हत त्या काळात ज्योतीबाचा हात धरून बाराखडी गिरवायला शिकलीस,लिहायला वाचायला शिकलीस,मुलींसाठी शाळा सुरू केलीस.
मला माहिती हवी होती.तुझ्या पहिल्या शाळेत म्हणे हातावर मोजण्याइतक्या मुली आल्या होत्या.एक मुलगी आली तरी तू अगदी मन लावून शिकवलस.सरकारन मात्र गुणवत्तेचा आणि पटसंख्येचा आधार घेत शाळाच बंद केल्या. म्हणे की "सरकार चालवण एवढी साधी गोष्ट नाहीये"असो.
जास्त काही करू नकोस पण तूला शिकवण्यासाठी प्रसंगी दगड आणि शेणाचा मारा सहन करावा लागला होता, याची सरकारला जाणिव करून दे.शाळा बंद करून तुला किती मस्त सरप्राईज देऊ केलय सरकारन.अभिनंदन सावित्री......
मला अगदी प्रांजळपणे वाटत तुझ्यासारख्या शिक्षीकेची आमच्या महाराष्ट्राला(साॅरी पुरोगामी) खुप गरज आहे. कारण शिक्षकांच सोडा पण मुख्यध्यापकसुद्धा आता लहान मुलींच्या चारित्र्याचे लचके तोडताना पाहतोय आपण.शिक्षण हा माणसाचा मुलभूत हक्क आहे म्हणून कर्ज काढून हलाखीत डिग्री पूर्ण करणाऱ्या मुलीच्या हाताला नोकरी लागत नाही. मग दोषी कुणाला ठरवायच सरकारी व्यवस्थेला की सावित्रीला.....?
सावित्री नदीचा पूल कोसळला.माणस मरताना तुझ्यात सामावून घेताना तुलादेखील जड जात होत ठाऊक आहे.नाईलाज होता शेवटी तुझा.व्यवस्थेला आता तुझा आवाज जात नाही बघ.
विद्यापिठाला तुझ नाव दिल जात पण नाॅनव्हेज न खाणाऱ्या मुलांची बुद्धीची गुणवत्ता कशी उठून दिसते हा अलिकडचा तुझ्या विद्यापीठातील तज्ञांच्या संशोधनाला नोबेल भेटायला हवा.संशोधनात भारत अव्वल आहे आणि अव्वलच राहणार फक्त तुझ्यामुळेच हे शक्य झाले.थँक यू सावित्री......
तुझ्यामुळे शिकून सवरून पदवीधर बाईने राम रहिम सारख्या अतीसज्जन माणसाच्या बचावासाठी हातात दगड घेऊन पोलिसांवर भिरकावण्याच सामर्थ्य फक्त शिक्षणामुळेच भेटले.खुप अभिमान वाटतो या गोष्टीचा.........
आज तुझी आठवण काढून ठिगभर संघटना आणि सरकार हात जोडतील निर्भया प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त करतील(दिल्लीत बलात्कार झाला होता याचा एव्हाना विसर पडला असेल ना सर्वांना)तेव्हा फक्त एवढच कर अशी भिरकावून कानाखाली दे आणि एवढाच जाब विचार की तुमच्या बायका आणि मुलींना तरी निर्भिडपणे जगण्याची मोकळीक दिलीये का तुम्ही.......
असो तरिही आश्वासक चित्र दिसेल अशी आशा करतो.निर्भयाला फक्त शब्दातच नाही तर जगतानासुद्धा निर्भिडता यावी हीदेखील आशा व्यक्त करतो आणि जाताना तुला शुभेच्छा.....
तू होतीस म्हणून तरी क्षितीज पाहू शकलो नाहीतर चुलीसमोरच्या विश्वालाच आयुष्य बनवून घेतल असत............
"थँक यू सावित्री"
शुभम काकडे