
विकासला आज भरून आल होत.गेली तीन वर्ष दहावीच्या बोर्डाच्या पेपरचा अभ्यास करून सुद्धा बरेचसे विषय निघत नव्हते.आज बोर्डाचा निकाल लागला. विकासच्या आणि त्याच्या पप्पांच्या काळजाची धडधड वाढायला लागली होती..सातवीत असताना विकास अगदी आरामात पास व्हायचा पण दहावीत आल्यापासून त्याचा मेंदू चालेनासा झाला.(त्याचा 'स्मृती'भ्रंश झाला होता म्हणे
विकासपेक्षा त्याच्या पप्पांना एवढा आनंद झाला की जणू एखाद्या अपरिचीत माणसाने त्यांना वेडच ठरवल असत(विकास जन्मापासूनच लई हुशार होता अस बरळत बसलेत म्हणे आता
"विकास तुला १५० मार्क पाडायचेत बर का ?"अस काका आवर्जून सांगायचे. त्याला ही कधीकधी अभ्यास करू वाटायचा पण गणितापेक्षा तो इतिहासाच्या विषयात जास्त रमायचा आणि त्यातही वैदिक संस्कृतीचा कालखंड तर त्याला अतीशय प्रिय....
गणितात विकासला कसेबसे ९९ मार्क पडले (आमित सरांनी पेपरच्या वेळी सगळी फिल्डींग लावली असूनसुद्धा
त्याच्याच वर्गातला पप्पूला तर सगळे लिंबू टिंबू समजायचे. तो नेहमी नापास व्हायचा.त्याच्यामुळे तो धड गणिताकडे लक्ष द्यायचा नाही की इतीहासाकडे,"जस चाललय तस बरं आहे " अस म्हणायचा.बर त्याच्या आईने दोन वर्ष त्याचा घरी भरपूर अभ्यास घेतला होता पण पोट्टया नापासाच व्हायचा.शेवटी आईने तुझ तू काय करायच ते कर बाबा अस पप्पूला सांगून टाकल. मग पप्पून "पटेल कोचींग"आणि दोनतीन ठिकाणच्या अपेक्षीत प्रश्नसंच पत्रिका मागवायला सुरवात केली.पण परिक्षेत यंदा पप्पू पास होईल याची पप्पू सोडून कोणालाच गॅरेंटी नव्हती.शेवटच्या रात्रीत भरपूर अभ्यास करून त्याने पेपर दिले. आज त्याच मार्कलिस्ट पाहील पोट्यान खरच प्रगती केली होती. गणितात भावाला ८० पडले होते मात्र इतिहासात पप्पू फेल झाला.एकून टक्केवारी काढली तर पप्पूला विकासपेक्षा जास्तच टक्के पडले आहेत पण एक विषय राहिल्यामुळे त्याची टक्केवारी न मोजता सरळ त्याच्या मार्कलिस्ट वर फेलचा शेरा मारला आहे.....
कुणी म्हणतय की विकासच्या वर्गावर पेपरच्या काळात आलेले परिक्षक त्याच्या नात्यातले असल्यामुळे त्याला उत्तर सांगत होते आणि विकासचे पप्पा पुढारी असल्याने दहावीच्या बोर्ड कमिटीवर त्यांच्या परिचयांच्या माणसांकडून विकासचे मार्क वाढवण्यात आलेत.... आता खर काय खोट काय हे सांगणे आत्ता तसे कठीणच आहे...पण हो पप्पूच कौतूक मात्र नक्कीच झाले पाहीजे आता पुढल्या वर्षी चांगला अभ्यास करून बोर्डात यायचा निर्णय पण त्याने घेतलाय आणि प्रश्नसंचाची उत्तर सोडवायला सुरवात झालीच आहे वाटत...
विकासच जरी घरातून आणि नातेवाईकांकडून कौतूक होत असले तरी विकासच्या शिक्षकांना पक्क ठाउक आहे विकास मठ्ठ आहे आणि मठ्ठच राहणार..............