Image may contain: sky, cloud and outdoor
माणस कशी घडतात हे अजूनही जगाला पडलेले खुप मोठ कोडं आहे पण माणसांनी घडविलेल्या काही गोष्टी अजूनही जगाला कोड्यात टाकतात बर का!...म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यात झाडापाला खाऊन जगणारा माणूस आता चंद्राला हात लावून परत माघारी घरी येतो अगदी पिकनिक वरून आल्यासारख("उद्या आई मी मंगळावर खेळून येतो हा" अशी आपली पोरं म्हणणार नाहीत कशावरून?)कल्पनेच्या आधारावर नवनिर्मीतीक्षम असणाऱ्या माणसाच्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बुचकळ्यात टाकतात तर अशाच एका वास्तूबद्धल आज बोलतोय की ज्याला स्वतःच एक निराळे अस्तित्व आणि त्यापाठीमागचा इतिहास आहे अर्थातच मुंबईच हार्ट "ताजमहाल हाॅटेल".....
काल 'ताज'ला ११४ वर्ष पूर्ण झाली.अगदी सगळ्यांनाच माहिती असाव की राजारजवाड्यांच्या काळात राजपदावर विराजमान होण्यासाठी मुकुट घातला जायचा त्याला "ताज" असही बोलल जात.म्हणजेच एक शौर्याच,अभिमानाच प्रतिक म्हणूनही या शब्दाकडे पाहील जाऊ शकत.शहाजहानने त्याच्या राणीच्या स्मरणासाठी एक वास्तू बनवली त्याला प्रेमाच प्रतिक 'ताज'महल अस नाव देण्यात आले.जगातल्या सात आश्चर्यात समावेश असणाऱ्या या वास्तूच्या नावात "ताज"हा शब्दप्रयोग येतो यावरून या शब्दाच्या आणखी खोलात जाण्याची गरज नाही. "भारताचे ताजमहाल" अशी संकल्पना आहे मग अशीच एक वास्तू बनवली जावी आणि त्याला ताजमहाल हाॅटेल अस नामकरण देण्यात याव असा विचार वास्तू बांधताना नक्कीच केला असावा. हे पुढे आपण पाहणार आहोतच... तर मुळ मुद्द्याकडे येऊ कारण इतिहासचा पेपर आपण तिसरीपासून सोडवत आलोच आहोत पण ताज हाॅटेलच्या इतिहासाबद्दल कदाचीत कोणाला काही कल्पना नसावी?मग हे पंचतारांकित हाॅटेल नक्की कोणत्या राजाने कोणत्या राणीसाठी बनवलय बाबा? शहाजहानचा आणि या हॉटेलचा काही संबंध आहे का ?असे विचार डोक्यात येत असतील तर हो नक्कीच तुम्ही चुकत आहात.....
भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमुहांपैकी एक असणारे जमशेदजी टाटा एकदा मुंबईतील सुप्रसिद्ध वाॅटसन हॉटेलमध्ये जात असताना दारपालने त्यांना अडविले आणि आत जाण्यास मनाई केली कारण हे हाॅटेल फक्त इंग्रजांसाठी खुले होते अर्थातच ही घटना घडली तेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीत होता.हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतात वाॅटसन हाॅटेलच्या तोडीचे पंचतारांकित हाॅटेल बांधण्याचा निश्चय केला की जे आपल्या समस्त भारतवासीयांसाठी खुले असेल.मात्र काहीजण या घटनेविषयी सहमत नाहीत(त्यांना टीकाकार अस संबोधले जाते) ते असे म्हणतात की,टाईम्स ऑफ इंडियाच्या संपादकांची अशी इच्छा होती की भारतात मुंबईला साजेसे असे भारतीयाने बनवलेले पंचतारांकीत हाॅटेल असावे जेव्हा ही इच्छा त्यांनी टाटांना सांगितली तेव्हा त्यांच्या मनात एक वास्तू तयार झाली आणि नंतर कागदावरून जमिनीवर अस्तित्वात यायला या वास्तूला अगदी काही वर्षांचा कालावधी लागला आणि १६ डिसेंबर १९०३ साली "ताज हाॅटेल"ची वास्तू बांधून पूर्ण झाली.....
भारतात बरेचसे गैरसमज असतात त्यातलाच एक असा की या हाॅटेलचा प्लॅन लक्षात न आल्यामुळे किंवा प्लॅनचा कागद उलटा पकडल्यामुळे या हाॅटेलचे प्रवेशद्वार समुद्राच्या बाजूला आहे जे की सरळ असायला हवे होते.. पण बोटीतून येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक करता येण सोईचे जावे म्हणून या वास्तूची रचना आपल्याला वाटते तशी उलटी (उलट्या काळजाचे कुठले) करण्यात आली आहे मुळात ती सरळच आहे.या हॉटेलची बांधणी "इंडो सारसेनिक पद्धतीने करण्यात आली असून मुळ बांधकामाचा आराखडा सीताराम खंडेराव वैद्य आणि डी.एन.मिर्झा या इंजिनीअर भारतीयांनी बनवला तर डब्ल्यू.ए.चेंबर्स या इंग्रज वास्तुविशारदाने या हाॅटेलचे बांधकाम पूर्ण केले(त्यामुळे भारतीय लोकांनी जास्त फुगून जाऊ नये यात इंग्रजांचा तेवढाच वाटा होता 😉)
एक मात्र प्रश्न पडतो की गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत मग खरी हाॅटेलची वास्तू कोणती?तर हो या हाॅटेलच्या दोन इमारती आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्हीही वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या वास्तूविशारदांकडून बनविण्यात आले आहेत आणि एकत्रितरीत्या या वास्तूला "ताजमहाल हाॅटेल"असे बोलले जाते.......(थॅक्स यू विकीपिडीया 😙😂)..... या हाॅटेलच्या बांधणीसाठी लागणारा कच्चा माल(पंखा,फरशा,जीने वगैरे.. वगैरे)
हा अमेरिका जर्मन तुर्कस्तान अशा देशांतून मागवण्यात आला होता आणि विशेष म्हणजे या हाॅटेलचा घुमट आयफेल टाॅवरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलपासून बनविण्यात आला आहे(अय्या म्हणजे ताज हाॅटेल बघून आयफेल बघीतल्याचा फील घ्यायला येईल किती मज्जा 😂😂 )
तर या हाॅटेलचा वापर पहिल्या महायुद्धाच्या काळात ६०० खाटांचे हॉस्पिटल म्हणून करण्यात आला आणि ज्या गोष्टीसाठी ताज हाॅटेल साऱ्या जगाच्या काळजावर कोरले गेले ते २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर...हा हल्ला देशाच्या अस्मितेवरचा हल्ला ठरला शेकडो परदेशी आणि भारतीय नागरिक मारले गेले..

                     Image may contain: sky and outdoor
बंदुकींच्या गोळ्या हाॅटेलच्या कानात घुमू लागल्या ,दारूगोळ्याच्या मार्‍याने हाॅटेलच्या भिंती कोसळू लागल्या...तब्बल दोन रात्री "ताज"अस्वस्थ होऊन गेले होते शेवटी "ताज" वरच संकट टळले मात्र शेकडो माणसांच्या प्रेतांची एकटी साक्षीदार बनणारी ही वास्तू खचून गेली होती.तीला काही केल्या उठता येत नव्हते.हिलरी क्लिंटनपासून राॅजर मूर पर्यंत जगविख्यात व्यक्ती भेट देऊन जाणाऱ्या या हाॅटेलमध्ये काही महीने बंदी घालण्यात आली.विदेशी पर्यटक बाहेरूनच २६/११ च्या आठवणी घेऊन उभ्या असणाऱ्या या हाॅटेलकडे बघून हळहळत होते शेवटी १५ ऑगस्ट २०१० साली पुनर्रचीत उभे राहीलेली ही वास्तू सर्वांसाठी खुली करण्यात आली आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा या हाॅटेलला भेट देणारे हल्यानंतरचे पहीले विदेशी पर्यटक ठरले.पाहता पाहता 'ताज हाॅटेल' जगाच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरू लागले....
गेली ११४ वर्ष ही वास्तू स्वातंत्र्यसंग्रमाचे आणि त्यानंतरच्या लोकशाहीच्या आधाराने उभारी घेणाऱ्या भारताचा प्रवास पाहत आलीये.अशा वास्तू नक्कीच भरपूर काही शिकवून जातात आणि प्रेरणा देतात फक्त शिकण्याची वृत्ती पाहीजे आणि ताजमहाल किंवा ताज हाॅटेल आपल्या देशाचे प्रतिक आहे की नाही या मुद्दयांवर भांडत बसण्यापेक्षा त्यांचे संवर्धन आणि संरक्षण आपल्या प्रशासनाची आणि राज्यकर्तांची मुख्य जबाबदारी आहे.......
मग कधी येताय ताज पाहायला??...
                                                                                                    शुभम काकडे