सकाळी उठल्या उठल्या दात न घासता,पेपरच्या आदल्या दिवशी रात्रभर जागायच म्हणून ,उगाचच फॅशन म्हणून,मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी टपरीवर,लग्नाच्या आधी बघाबघीच्या कार्यक्रमात वापरण्यात येणार तुम्हाआम्हा सर्वांच लाडक पेय म्हणजे चहा.(चिनी लोक "छा" बोलायचे आपण चहा केल डोकय राव आपल्याला
😂 )तर आज हे आख्यान सांगायचे कारण म्हणजे आज "जागतीक चहा दिन"(जागतीक बियर दिन साजरी नाय केली म्हणजे मिळवली) तर या चहाच्या नादान खुळ्या झालेल्या व्यसनी तमाम बांधवांना HAPPY TEA DAY......
बोलल जात की चीनचा राजा शॅन नुंग(लईच बेकार नावय हसायलाच येत) असो.तर हा राजा गरम पाणी पिताना काही झाडाची पान याच्या कपात येऊन पडली आणि या खुळ्यान ते पाणी तसच पिल त्याला लईच ग्वाड वाटल आणि या चहाच्या चवीन जगाला खुळ केल.आपल्या भारतात आसाममध्ये आदिवासी असलच काहीस झाडाची पान पाण्यात टाकून प्यायची इंग्रजांना पण हे पेय आवडल त्यांनी याचा व्यापार करायच ठरवल आणि मग गव्हर्नर लाॅर्ड बेंटीक न चहा उत्पादनाच्या पडताळणीसाठी समितीची स्थापना केली.
माणस कुठ कुठ डोक लावतील याचा काही नेम नाही. असच ब्रिटनमधून इम्पोर्टेड केलेले उच्चविद्याविभूषित अधिकारी 'ए सी ब्रुस' आणि 'चाल्टर्न' यांनी चहाच्या संशोधनासाठी डोक्याचा भुगा केला आणि मग चहाचे मळे फुलू लागले.कदाचीत एक गोष्ट कुणालाच माहित नसावी हा चहा आपल्या भारतीय लोकांच्या शोषणास एकेकाळी कारणीभूत ठरला होता.या इंग्रजांच्या चहाच्या मळ्यावर काम करण्यासाठी कंत्राटी तत्वावर मजूर भरले जायचे.आसाम बंगाल बिहार मधली खाण्याला महाग झालेले आपल्या बांधवांना या मळ्यात राबवून घेतल जायच आणि मोबदल्यात त्यांच्या हातावर दिमडी ठेवली जायची.कामानं खंगून गेलेल्या मजूरांना चाबकान फोडल जायच.गुरासारखी वागणूक दिली जायची आणि यात ३५ हजार मजूरांचा दुर्दैवी अंत्य झाला....
मुंबईत आणि एकूनच भारतात कष्टकऱ्यांच्या पोटाची भूक मारून त्यांना जगवणारा हाच 'चहा' आता राजकारणाचा मुद्दाही बनत आहे....(त्या महान इसमाबद्धल मी पामर अजिबात बोलत नाहीये विचार पण करू नका
😁)
तर अश्या या चहाचे उत्पादन भारत स्वातंत्र्यानंतर अजूनही घेतच आहे आणि जगात चहा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.आपल्याकडची माणस स्वतःची नवी थेअरी बनवून चहा पीत असतात
उदा: जेवणानंतर चहा पिल्यावर पचनक्रिया सुधारते..चहा पिल्यावर तरतरी येते (मटणाचा रस्सा पिल्यावर येते तशी
😉),चहा पिल्यावर डोक शांत होत वगैरे वगैरे....असे बरेचसे शोध लावून चहा पिणारे अट्टल बेवडे(कस वाटतय दारूड बनल्यासारख
😂)....बघा या चहाने कोलेस्ट्रॉल, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी, मलावरोध ,पक्षघात,शुक्राणूंची संख्या कमी होणे,स्मृतीनाश(गजनीचा झालता तसा
😂) असे बरेचसे ऐकिवात नसणारे आजार चहाच्या अतीसेवनाने होत आहेत असे आढळून येत आहेत.....
मी चहा पीण वाईट आहे अस म्हणत नाही आणि तमाम चहाप्रेमींचा(त्यात मी पण येतो बर का
😉) हिरमोडही करत नाहीये फक्त जरा प्रमाणात घेऊयात.....
चला मग येताय ना प्यायला (चहा म्हणतोय मी)..........

शुभम काकडे