"भारताशी नाळ जुळलेला नायपाॅल"

राष्ट्रीय नागरीक नोंदणीतून आसामच्या ४० लाख नागरिकांना वगळण्यात आल्याने देश ढवळून निघालेला असतानाच या मातीतच जन्माला आलेला 'विद्याधर सुरजप्रसाद नायपाॅल' नावाचा माणूस काळाच्या पडद्याआड लोटला गेला.जातीपातीचे आरक्षण,वेगवेगळ्या मागण्यांसाठीचे पुकारलेले डझनभर संप,सत्ताधारी-विरोधकांच्या टिवल्या बावल्या पाहण्यात गुंग असणारे इंडियन लोक्स आणि सामाजीक व राजकारणातल्या एखाद्या प्रश्नावर ढासून मत मांडणारी नेटीझन्सला अगदी कालपर्यंत 'वि.एस.नायपाॅल' हे नाव नक्कीच परिचीत नसेल आज मात्र या नावाचा गलबला वर्तमानपत्र,टिव्ही आणि एकूणच माध्यमसमुहातून केला जात असल्याने या माणसाच्या जीवनप्रवासाची कहाणी आपल्या कानशीलावर पुसटशी का होईना नक्कीच धडकून गेली असेल.
नेपाळच्या मातीत त्रिनीदाद जवळच्या चगनवास याठिकाणी वी.एस नायपाॅल यांचा १७ ऑगस्ट १९४३ मध्ये जन्म झाला.वडील सिप्रसाद नायपाॅल प्रसिद्ध पत्रकार व फिक्शन लेखक असल्याने लहानपणापासूनच वाचणाचे संस्कार त्यांच्यावर होत गेले.नायपाॅल हे नाव कदाचित नेपाळमध्ये स्थायिक असल्याने पडले असावे.उच्चशिक्षणासाठी स्काॅलरशीप मिळाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात इंग्रजी साहित्यासाठी प्रवेश घेतला आणि याठिकाणीच त्यांची पत्नी पॅट्रेशियाला भेटले.कुटुंबियांना न कळवताच नायपाॅल व पॅट्रेशिया यांनी लग्न केले. पण बि.लीटच्या परिक्षेत नायपाॅल काही कारणास्तव पास होऊ शकले नाहीत.यानंतर बराच काळ त्यांना गरिबीला सामोरे जावे लागले.या काळात दम्याच्या आजाराने ग्रासल्याने बायकोच्या पगारावर चरितार्थ चालू होता आजारातून मुक्त झाल्यावर ते बिबिसी वर्ल्ड सर्विसला रूजू झाले.याठिकाणी पश्चिम भारतीय साहित्यावर ते चर्चा घडवून आणत.यातूनच त्यांचा कल लेखनाकडे जाऊ लागला. अगदी सुरवातीच्या काळात स्पेनच्या बंदरावर स्थायिक असताना नायपाॅल यांच्या मनात विलक्षण कुतूहुल आणि जिज्ञासा असल्याची जाणिव त्यांच्या वडीलांना झाल्याने लेखनक्षेत्रात नायपाॅल यांनी ठसा उमटावा अस मनोमन वाटत होत.यानंतर नायपाॅल यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर जवळजवळ तीस हून अधीक पुस्तके लिहीली
इन ए फ्री स्टेट(१९७१) ए वे इन द वर्ल्ड (१९९४) हाफ ए लाईफ(२००१)मैजिक सिड्स (२००४) इ. कलाकृतींचा विशेष उल्लेख करावा लागेल.जगप्रसिद्ध बुकर व नोबेल पारितोषीकानेही या अवलीया माणसाचा गौरव केला जात असतानाच याच अवलियाला ब्रिटीश एम्पायरने 'नाईटहुड' उपाधी देऊ केली.
नायपाॅल यांच्या साहित्य कलाकृतींकडे डोळसपणे पाहील्यावर बर्याच आश्चर्यकारक गोष्टी वाचायला भेटतात जनसत्ताच्या रिपोर्टनुसार नायपाॅल यांनी भारताचे "गुलाम समाज"असा उल्लेख केला असून भारतीय महिला कपाळावर टिकली लावून "आमच डोक रिकाम आहे" असा निर्देश देत असल्याचे लक्षण असते असे परखड विधान करतात.नायपाॅल भारतीय वंशाचे असल्याने माध्यमसमुहातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गाजावाजा केला जात असतानाच त्यांनी भारतभेट देऊन जन्मभूमीची नाळ जोडल्याचे अधोरेखीत केले गेले जात असताना मात्र हेच नायपाॅल ब्रिटीश पंतप्रधान टोनी ब्लोअर यावर टीका करताना "चाचा" असा खोचक शब्दप्रयोग करीत इस्लामने इतरांना गुलाम बनवले असे बेधडक विधान करीत,तर राम मंदीरावरून इस्लाम मुलतत्ववाद्यांवर टीका करतानाच सध्याच्या भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्यावरही सडकून टीका लेखणीतून करताना दिसायला लागतात. तेव्हा जर नायपाॅल भारतात असते तर खरच"जैसे थे'बोलू शकले असते का? की राणा आयुब तस्लिमा नसरीन इ. शेकडो लेखकांसारख ट्रोलर्सच्या झुंडीत नायपाॅल हरवून बसले असते का?हा शेवटी प्रश्नच राहतो.
यापुढे जर भारतीय लेखकाला नावारूपास यायचे असल्यास विलायतेत राहून लेखनप्रपंच केल्यास किमान ते साध्य होऊ शकते पण भारतात हे कदापि शक्य होऊ शकत नाही कारण 'देशद्रोहाचे' बिल्ले आपल्याकडे कमी किमतीत विकायला भेटतात .असो किमान यावरून तरी नायपाॅल यांच्या रूपाने भारताने जगाला दिलेली खुप मोठी देण असल्याच मिरवल जाणार बेगडी शौर्य संवेदनशील नागरीकाच्या सहज लक्षात येईल..........
शुभम काकडे