अस्वस्थता


अस्वस्थता

     
                                                         मला माहित नाही १५ ऑगस्टला सकाळी लवकर उठायच म्हणून आदल्या रात्री अस्वस्थ असणार आपल्यातल मुल मरून गेलय की काय?

रविवारच्या दिवशी "समाजशास्त्राचा" गृहपाठ राहिला म्हणून रात्रभर जागून एक छडी वाचविण्यासाठीच्या भितीने लहाणपणी जीवाचा आटापिटा करणारी माणसं...

रस्त्यावर थुंकतात,एसटीतून बिस्कीटच्या पुड्याचा कागद फेकतात  आणि हसून एवढ तेवढ चालायचच?"
 अस सहज म्हणतात तेव्हा समाजशास्त्राच्या सगळ्या संकल्पना भिरू लागतात आजूबाजूला, उत्तर नसलेली प्रश्न विचारतात.

 लहानपणी तर सगळे प्रश्न सोडवले होतेच की पेपरात म्हणजे, 'भारतीय नागरिकांची मुलभूत कर्तव्य कोणती? 'वगैरे वगैरे..

 छडी वाचवताना संस्कार वाचवायला कुणीच शिकवल नाही...
'लेमनगोळी' भेटेल म्हणून तासभर आजोबांचे पाय चेपून देणारी माणस  घरात आजोबा जिवंत आहेत हे विसरून देखील जातात..
 
   "भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत"
 सकाळच्या परिपाठाला घोकून पाठ करून टाकलच होत की...

 पण आता हिरवा  रंग बघितल्यावर डोक्याचा भडका उडतो त्यांच्या भारतीय नागरीकत्वावर शंका घेतो
 प्रतिज्ञेतला "धर्मनिरपेक्ष"शब्द खरच समजलाय का आपल्याला.?

खरच बदललोय का आपण?
 शांत पाण्यात एक दगड टाकल्यावर विस्कटणार आपलच प्रतिबिंब अस्पष्ट दिसतच की पण दगड टाकण्याआधी स्पष्ट दिसणारा आपलाच चेहरा बघायचा विसरून जातो आपण..
खरच "मुखवटा" घालून फिरणाऱ्या माणसात मी तर मोडत नाही ना?...

                शुभम काकडे