शौचालयातील साहित्याविष्कार......
जगात सर्वात जास्त creativity कोणते काम करायला लागते?असा प्रश्न विचारला गेल्यास या पामराच्या तोंडातून फक्त "शौचालयाच्या भिंतीवरचे लिखाण" हे शब्द न कचरता बाहेर पडतील.विचारवंत अगदी जीवाचा आटापीटा करून सांगत असतात तरूण पिढीला वाचायची आणि लिहायची मुळी सवयच नाही यावेळेस मी मात्र समस्त भारतवासी तरूणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण मी कष्ट पाहतोय,प्रसंगी महाविद्यालयातील क्रमिक अभ्यासक्रमाच्या वह्या रिकाम्या ठेवतील परंतु शौचालयास बसल्यानंतर जीवाचा आटापीटा करून भिंतीवर मराठी साहित्यातील गद्य पद्य चारोळया वगैरे नाना तर्हेच्या साहित्याचे आविष्कार करणाऱ्या या तरूण पिढीला सुरवातीला मानाचा मुजरा.........
या नवीनच उदयास आलेल्या लेखणक्षेत्रात इंग्रजी साहित्यालाही लाजवेल अशी प्रगती सध्या भारतात होताना दिसून येत आहे.मराठी गुजराती यांसारख्या प्रादेशिक भाषांपासून अगदी हिंदी भाषेतही या लेखनशैलीचा वापर होत आहे.सावरकरांनी तुरूंगातल्या भिंतीवर महाकाव्ये रचली आणि त्यानंतर पुस्तकरूपाने ते समस्त भारतवासीयांना अनुभवता आले अशाचप्रकारे शौचालयातील भिंतींवरचे मजकूर पुस्तकरूपाने संकलित करण्यात यावे अशी मागणी तरूणांतून येत आहे. भारतात बराच भेदभाव पाहायला मिळतो असेच या प्रकरणातही तो होताना दिसून येत आहे पुरूषांचे लेखन फक्त पुरूष वाचकांसाठी मर्यादीत राहत आहे तसेच महिला वर्गात हा साहित्यप्रकार रूढ झाला आहे की नाही याची मलातरी अजूनही पुरेशी कल्पना नाही आणि भविष्यात कधी याचा शोध लावता येईल याचीही शाश्वती नाही म्हणूनच एकमेकांच्या मनातले विचार स्पष्ट होण्यासाठी या साहित्य प्रकारात खुलेपणा यावा एवढीच माफक अपेक्षा......
विशेष म्हणजे या साहित्य प्रकारातील लेखक आपले संपर्क क्रमांक त्याच ठिकाणी लिहीत असून आपण या साहित्याविषयी त्यांच्याशी व्यासंगपूर्ण संवाद साधू शकता!!! तसेच या साहित्यकलाकृतीचा आस्वाद आपणाला विनामूल्य मिळू शकतो बर का....
शेवटी भारत तरूणांचा देश आहे आणि त्याचे भविष्य या साहित्यकारांच्या हातात आहे..............
शुभम काकडे