
"आई निजवलीस ना?"
किती सहजरीत्या म्हणून गेला होता तो,
मी मात्र मोठा आवंढा गिळतच फोन कट केला.
गेली कित्येक दिवस असच चालल होतं.
त्याने मला फोन करणं, त्याच्या फार्महाऊसवर बोलवणं, मी नकार देणं आणि त्याने आईवरून शिव्या देणं...
आईच मन दुखवल म्हणून बाबांशी भांडणारी,अगदी महिनाभर तोंड न पाहणारी मी आज एवढी हतबलं झाली होती?
का?
माझी चुक फक्त एकच
"त्याच्यावर विश्वास टाकला"
प्रेमात पडले होते मी त्याच्या...
अगदी न्यू कपल्स प्रेमात जे काही करतात
ते सुद्धा लाजरा, खुुजरा स्वभाव
ठेऊन मी केलं होत ..
तो मात्र अगदी बिनधास्त
हात हातात पकडायचा,
किस करायचा,
मी मात्र कायम गोंधळलेले.
खरतर मलाही हवहवसं वाटायला लागलं होत ते सगळं.
आणि ते स्वाभाविक होत कारण असं पहिल्यांदाच कुणितरी
हात हातात घेतला होता,
ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवून
मन हलकं केल होत, खुप जीव जडला होता त्याच्यावर...
त्या दिवशी नेहमीच्याच बागेतल्या बाकडावर त्याला किस करताना मी थोडसं हसतच विचारलं
"लग्न करशील माझ्याशी?"
त्याच्या कपाळावर आठ्या आणि ताणलेली शीर स्पष्टच दिसत होती. मला वाटलं नाटकीच करतोय की काय हा?
मीही थोडसं लाडात
येऊन त्याच्या गळ्यात पडताना ओठावर ओठ टेकवताना विचारल
"बोल ना बच्चा करशील ना लग्न माझ्याशी?"
तो अगदी शांत, स्वभावविरोधी त्यानेही हसत हसतच उत्तर दिलं
"किस केला म्हणजे लग्न करावच लागत अस नाही समू? इट जस्ट फन! या गोष्टींचा फक्त आनंद घ्यायचा असतो मनसोक्त!!"
त्याच्या ओठावर टेकवलेले माझे ओठ कडवट झाले होते, घाबरलेले, बिथरलेले, श्वास वाढू लागला होता, तो मात्र शांत त्याच्या चेहर्यावर फुललेल हसू जरा विक्षीप्त वाटत होत.
तो मात्र माझ्या जवळ आला त्याने हातात हात घेतला काही समजायच्या आतच मी दोन कानाखाली भिरकावून लावून दिल्या त्याच्या.
घरी आल्यावर रडले, चिडले, भांडले
सगळ स्वतःशी घडत होत.
कित्येक तास शाॅवरखाली बसून
अगदी स्तब्ध झाले होते.
शेवटी बळ एकवटून
त्याला फोन केला खूप भांडले,
नंबर ब्लाॅक केला,
त्याची गिफ्ट-लवलेटर्स डस्टबीनकडे भिरकावली...
अगदी सगळं काही नष्ट करून टाकायच होत मला!!!!
शेवटी त्याचा फोन आलाच, .मी कट करून करून थकलेले, थोडं निवळावं याच उद्देशेनेच फोन उचलला
पलीकडून आवाज "जानू"
मी अगदी शांत होऊन विचारल
"प्लीज पुन्हा फोन करू नको"
तो चिडला
त्याच्यातला पुरूष जागा झाला
"भिकारडे तू मला नाही म्हणतेस एवढचं करायच होत तर सुरवातीला आई कशाला घालायचीस?............
मी फोन कट केला होता,
मी घाबरले होते
पण नाही
मला माहितीये त्याचा फोन पुन्हा येणार???
तो शिव्या घालणार??
मला भिडायला हवं????
आत्ता नाही तर
कधीच नाही.......
मी शुभम