"सेक्स आणि gender" मधला फरक



                                                   No automatic alt text available.
        

  
लहानपणापासूनच डायपर घालून 

प्रश्न झाकत जातो आपण.. गोंधळ वाढत जातो. 

कळत्या वयात काही प्रश्न पडतात शंका विचारल्या जातात
 आणि तेवढ्याच तिव्रतेने दाबल्या जातात.संभ्रमावस्थेत काही वर्ष निघून जातात काही
 शब्द कानांवर पडतात शोध घेतला जातो 
पुस्तकांपासून नेटपर्यंत मात्र गुंता वाढत जातो. प्रश्नाच स्वरूपच बदलल जात नकळत.
 दहावीत मग कुठेतरी लिंग लैंगिकता शिकवली जाते.

वर्गातल्या मुलींना दबल्यासारख वाटत शिकवताना मग बाई 
मुलींना वेगळ आणि मुलांना वेगळ अस वेगवेगळ करून शिकवतात. 
या दोन जीवांना "काखेत केस येणे" ही साधी गोष्ट 
पण किती घाणेरडी वाटत जाते वर्गात हशा पिकतो 
आणि लैंगिक शिक्षणाचा बट्याबोळ होतो.तीचा स्पर्श जरी झाला
 तरी ताठरता येत मानसीकतेला...

जन्माला येताना फक्त लिंग वेगवेगळे घेऊन जन्माला येणारे
हे दोन जीव. एक "ती" तर दुसरा "तो" या कॅटेगरीमध्ये मोडतात.
 तिच्यात बाईपण रूजवलं जात तर त्याच्यात पुरूषार्थ.

पायथागाॅरसच प्रमेय मन लावून न वाचणारी टवार पोरसुद्धा
 मन लावून अभ्यास करतात या विषयाचा. कुठून येते एवढी भूक?
 काॅलेज जीवनात मग अवघड होऊन जात गुंता सोडवावा वाटतो, 
मग प्रेम, प्रेयसी, प्रियकर, सेक्स, संभोग अगदी सगळ काही शिकावं वाटत मन लावून..

आयुष्य उध्वस्त केली जातात एकमेकांची. माणस जनावरं बनतात अत्याचार वाढतात 
आणि जीव गेल्यावर मेणबत्ती पेटवली जाते .समाज बिघडत चाललाय का?
 मानसिकता बिघडत चाललीये का? 

असले फालतू प्रश्न विचारणार्यांना तरी "सेक्स आणि gender" मधला फरक समजलाय का?

शुभम काकडे