
पत्र्याच्या खिळ्यातून पाऊस झेलताना
पातीलं घमेली मेटाकुटीला येतात
आडोशासाठी घर बांधली
माणस कोरडेठाक
घर मात्र भिजत राहिली,
कधी डबकी भरतात
तर कधी
कोंब तरारून येतात मातीतून.
ऑफिसवरून सुटलेली..
स्टँडवर आडोसा घेणारे...
हजारो जीव प्रश्नार्थक नजरेन
पाहतात थेंबांकडं...
जगण्यातला एकसूरीपणा
भिजवून बदलता येतो
असा विचार देखील शिवून
जात नाही यांना
तो त्याच्या गुणधर्मानुसार भिजवत जातो
आपण मात्र भिजायच विसरतो
कदाचीत "माणूसकी" यामुळेच कोरडी झाली असेल........
शुभम