कपल्स एकमेकांना एवढे चिकटून बसलेले होते की मला माझ अंग चिकट वाटू लागल तसही मुंबईच्या हवेत समुद्रामुळे चिकटपणा येतो हे आता शाळेतल शेमड्या पोरालाही माहित असाव तर चेष्टेचा भाग सोडून द्या. मुंबईच नाव काढल्यावर डोळ्यासमोर तळरत जाणारी हजारो दृश्यातील एक ठळक,कधीही पुसल न जाणार,मुंबई शहराबद्धल गुढ आकर्षण असणारा प्रत्येक जीव या ठिकाणी आल्यावर तृप्त होतो,कामाचा कंटाळा असो वा एकांतात मेडीटेशन करायच असो,शेजारच्या हायफाय लोकांच माॅर्निंग वाॅक असो किंवा नव्यानच संसाराला सुरवात करणार जोडप असो.या सगळ्यांसाठीच मरिन ड्राईव्ह जादूच्या कांडीसारखच काम करत.मुळात मरिन ड्राईव्हला मुंबईच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू बोलल तर नक्कीच वावग ठरणार नाही.......
तीन किलोमिटरचा हा रस्त नरिमन पाॅईंटला सुरू होतो आणि गिरगाव चौपाटीला जाऊन थांबतो.मरिन ड्राईव्हवरून जाणार्या रोडचे नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता असे नामकरण करण्यात आलेले असून इंग्रजीतील 'सी' आकाराचा हा भाग 'क्विन नेकलेस' म्हणूनही ओळखला जातो.कारण रात्रीच्या वेळी उजाळत्या प्रकाशातील चंदेरी प्रकाशात राणीच्या गळ्यातील नेकलेस सारखा हा परिसर उजळून निघतो. महागड्या रस्त्यांपैकी एक असणारा या रस्त्याच वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनारी असणारा लांबलचक कठडा आणि त्यावर बसून हायफाय जगाकडे पाठ करून समुद्रावर नजर खिळवून बसलेले हजारो मुंबईकर.(मुळात जो मुंबईत येतो त्याला मुंबईकरच म्हटल जात)रस्त्याच्या पलिकडे असलेल्या "आर्ट डेको" बिल्डींगचा पसारा जवळजवळ १०० वर्षांपूर्वी पारशांनी पैशाच्या जोरावर उभ्या केल्या आणि याच इमारती रात्रीच्या मिणमिणत्या दिव्यात मरिन ड्राईव्हची शोभा द्विगुणीत करतात दिसतात.वानखेडे स्टेडियमवर आलेले क्रिकेटरसिक,मंत्रालयातील जिवघेण्या धावपळीतून कंटाळलेले चाकरमणी,लवस्पाॅट शोधून शोधून थकलेले कपल्स,महागड्या गाड्यांतून डिनर करण्याआधी फेरफटका मारणारे चकचकीत कपड्यांची माणस,कुत्र्याला सकाळ संध्याकाळ फेरफटका मारणारे 'डाॅग ऑकर',आमदार निवासात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे आणि निगेटिव्हीटी भरल्यावर थोडस मनमोकळ वाटण्यासाठी येणारे शेकडो तरूण,काॅलेजच्या मित्रांसोबत टिंगल टवाळी करणारी गॅग,कटट्यावर झोपलेले डझनभर भिकारी आणि कैरीच्या फोड्या करून सोबत भेळ चढ्या भावाने विकणारे फेरीवाले यामुळे हा भाग नेहमीच गलबलून गेलेला असतो.सुरवातीला आल्यावर थोडस विचीत्रच वाटत,कारण एकांत मिळावा म्हणून या भागाच नाव कानावर पडलेल असत. मग आजूबाजूच्या माणसांचा पसारा पाहीला की थोड बुजल्यासारख होत. पण हे बुजलेपणा जास्त काळ टिकत नाहीच.एकदा मागच्या चकचकीत श्रीमंतीकड पाठ केल्यावर समोर फक्त तुमच आणि समुद्राच नात जुळून जात. अगदी कित्येक तास बसल्यावरही तुम्ही कधीच बोअर होत नाही. तुम्ही या सागराच्या प्रेमातच पडून गेलेला असता.
हवेचा झोत तुमच्या शरिराला स्पर्श करतो आणि तुमच्या सर्वांगावर काटा उभा राहतो. आजूबाजूचा गोंगाट विरून सागराचा संथ आवाज तुमच्या कानात घुमू लागतो,किनार्यावर आदळून तयार झालेली लाटेचा फवारा कधीकधी तुमच्या चेहर्यावर येतो आणि आयुष्याच्या सगळ्या प्रश्नांचा निचरा होतो.तुमची तहान खुप मोठी झालेली असते.ती बिस्लरीच्या बाटलीत भागवता येतच नाही.समुद्रात मिसळून जाव अस वाटायला लागत.तुमच्या मेंदूवर एकांताची बधीरता चढलेली असते आणि शांततेच परमोच्च शिखरावर तुम्ही विराजमान झालेला असता.
तुम्हाला वाटू शकत की खूप अलंकारिक बोलून उगाच सोन्याचा मुलामा देतोय की काय? तर एकदा इथे आल्यावर येणारा अनुभव हा माझ्यापेक्षा नक्कीच वेगळा नसेल.. त्यासाठी तो क्षण जगावा लागतो.युट्यूबच्या व्हिडीयोवरून आणि बाॅलिवूड मुव्हीमधून मरिन ड्राईव्ह बघून समाधान मानलत,तर नक्कीच तुम्ही एका मोठ्या क्षणाला मुकणार आहात शेवटी तो क्षण जगायलाच हवा आणि यासाठी तरी मरिन ड्राईव्हला नक्की भेट द्या.
सूर्य अस्ताकडे जात असताना थंडावलेला समुद्र बघताना क्षितीजावर बदलत्या रंगाच्या छटा आणि सुर्यास्तानंतर दिव्यांनी उजळून निघणारा मरिन ड्राईव्हचा परिसर खरच क्षणभर खिळवून टाकतो.चालत चालतच रपेट मारलीत तरी प्रेमाची शेकडो उदाहरण एका नजरेत वाचता येतात
उदा: लग्नानंतर एक्स्ट्रा अफेयर करणारी जोडपी, काॅलेजच लेक्चर बुडवून कटट्यावर चाळे करत बसलेले कपल्स एवढच काय तर अगदी सहावी सातवीतली पोरही आपापल्या गर्लफ्रेंडला आणून निवांत खांद्यावर हात टाकून चाळे करताना बघताना दिसतील आणि जगाची चिंता न करता सगळा गोंगाट मागे टाकत बिनधास्त किंसींग सिन इथे पावलापावलावर पाहायला मिळतात आणि त्याचही आप्रुप किंवा गैर वाटेनास होत कारण ही जागाच मुळात मंतरलेली असते तुम्ही तिच्यात गुंग झालेला असता.......
खटकणारी गोष्ट एवढीच की समुद्र समोर असताना सगळ काही विसरून त्यात मिसळून जायच सोडून बरेच जण अधाशासारख समुद्रावर तुटून पडतात शेवटी सेल्फी काढायची असते जवळजवळ दोन तासभर सेल्फी आणि मरिन ड्राईव्हला कॅमेरात टिपताना त्यांच्या डोळ्याची चांगल्या लेन्सची क्वालिटीवर मात्र झापड लावलेली असतात.समुद्राकडे बघायच सोडून रस्त्याकडे बघतच चकचकीत गाड्यांच सौंदर्य बघत बसलेल्या आणि फेसबुकवर पोस्ट बघत बसलेली माणस आजूबाजूला बघून मला त्यांची खरच किव येते.
मुंबईत असल्यावर कधी एकट वाटल्यावर नकळत पाऊल मरिन ड्राईव्हकडे वळतात.दररोजच्या कटकटी आणि हजार भानगडी करून विटलेला जीव इथे आल्यावर शांत होतो.लाटांकडे बघत मी रमून जातो मला माझ्या आयुष्याचा विसर पडत जातो.डोळ न मिटता आपोआप घडणार मेडीटेशन अनुभवायच असेल तर नक्कीच मरिन ड्राईव्हच्या कठड्यावर बसून आयुष्याकडे पाठ करून समुद्र उघड्या डोळ्यात साठवता आला पाहीजे............
शुभम काकडे
