"ब्रेक्झीटा आणि मे बाई"
"ब्रेक्झीटा"इंग्लडमध्ये जन्माला आली.कसबस युरोपात १९७३ ला तीच लगीन लावून दिल.हुंडा वगैरे काही घेतला नाही पण सासरच्या जरा जादाच डिमांड होत्या.जास्त नादी न लागता सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण इंग्लडच्या वर्हाडींच परंपरागत चालत आलेल "जीबीपी" हे नाण बदलून सासरकडच "युरो" नाण लागू कराव लागेल या मागणीला मात्र इंग्लड वर्हाडींनी विरोध केला म्हणून ते या मागणीला खतपाणी घालत नाही हे पाहून सासारची मंडळी नाणी न बदलण्याचा निर्णय घेतात. ब्रेक्झीटा"लहानपणापासून लाडान वाढलेली पोर.अगदी ४५ वर्ष सुखाचा संसार करते पण सासरकडचा "जर्मनी"इंग्लडी जनतेला डोईजड वाटू लागते.अगदी चारचौघात अपमान करायचा.स्वतःची श्रीमंती मिरवायची आणि आपल्याला अगदी थर्ड क्लास वागणूक द्यायची पार इज्जतीचा फालुदा करायची.अस कुठ असत का? यामुळे "ब्रेक्झीटा"चा सासुरवास घडत होता.माहेरची मंडळी ढसाढसा रडत होती पण उगाच पोरीचा संसार नीटनेटका चालल अशी भाबडी आशा मात्र कायम होती.
प्रकरण तस जास्तच चिघळू लागल.एके दिवशी तर सासरची म्हणजेच युरोपात जागा न भेटलेल बिर्हाडाची लोंढे सूनच्या दारात येऊन आदळले.थोडी दयामया म्हणून रहायला जागा दिली तर या मंडळींनी हातपाय पसरायला सुरवात केली.माहेरची मंडळीची तळपायातली आग मस्तकात गेली."ब्रेक्झीटा ला नांदू द्यायच का नाय?"यावर गहन डिस्कशन चालत पण निर्णय काही केल्या होत नाय शेवटी वैतागून घरचा कर्ता पुरूष कॅमरून लोकशाही पद्धतीन मतदान घेतो आणि माहेरची मंडळी ब्रेक्झीटाने काडीमोड द्यावा असा कौल देतात.कॅमरूची दातखीळ बसते पण घरातल्यांची म्हणण ऐकलच पाहीजे असा दबाव काय कॅमरूनवर नसतोच म्हणा. आणि तसही फिफ्टी फिफ्टी मतदान होऊन अवघ्या काही तीन टक्के मतदान काडीमोडाच्या बाजूने गेले असले तरी फायनल डिसीशन तोच घेणार होता. कॅमरून रावांचा कंठ दाटून येतो.सुरवातीपासूनच त्याचा पोरीच्या घटस्फोटाला विरोध.पोरीन सासरच्या मंडळींना जरा समजून घ्याव अस त्याच म्हणण.पण घरातली माणसच पालटलेली बघून तो घरातल्या कर्तेपणाचा राजीनामा देतो आणि संन्यासी बनतो.
"मे"बाई अशा कठीण प्रसंगी आपणच कुटूंबावर फिरलेला गाढवाचा नांगर वाचवू शकते या अपेक्षेने घरकारभाराची सूत्र ती हाती घेते .घरातल्या सदस्यांची काडीमोडाची पडत्या फळाची आज्ञा समजून बाई कंबर कसून कामाला लागते.संसारात मन रमलेल असत लगेच हटकून राहण जीवावर येत म्हणून "ब्रेक्झीटा"ला काडीमोड झाला असला तरी 'मे'बाई तीला कागदी घटस्फोट होईपर्यंत सासरी वावरायला परवानगी देते .
पोरीच मन सासरकडून काढायच असेल तर तीला सासरी पाठवूच नये असा हेका "ब्रेक्झीटा"चे डेव्हिड काका आणि जोन्सन मामांचा असतो ते पार हट्टाला पेटतात की तीला अजीबातच सासरच तोंडच दाखवायच नाय. पण "मे"बाई काही केल्या ऐकत नाही शेवटी काका आणि मामा दोघे "मे"बाईंच्या कुटूंबाला रामराम ठोकतात.
असा सगळा प्रकार घडून आलाय पुढ काय होईल कुणालाच माहीत नाही."ब्रेक्झीटा"ला मनातून नांदू वाटतय पण सासरची मंडळी आणि "मे"बाईंच्या हट्टान ती मधल्या चिमटीत सापडली आहे.
माहेरच्या मंडळींच काय होईल हा पुढचा प्रश्न आहे पण "ब्रेक्झीटा"सासरच्या आठवणीने गळा काढून रडतेय एवढ मात्र खर.............
शुभम काकडे