आठवणी भाग -१

मोबाईल अनाकलनिय वाटायचा तेव्हा सगळ जग कस भारलेल असायच.रात्रभर लाईटीचा हाफ असायचा तरी खुप शांत मनमोकळ वाटायच.संध्याकाळी वर्हांड्यात जेवण झाल्यावर चटई टाकून आकाशातल्या चांदण्या मोजण्याइतका निवांतपणा कशातच नव्हता.
परिक्षेच्या काळात दिव्याच्या काजळीत घोकंपट्टी करताना आपल्याकडे इनव्हटर्र आल्यावर मी एकदम टाॅपचा अभ्यास करणार अशी स्वप्न बाळगायचो.
सातवीला असताना कविता जुळवायचा प्रचंड नाद लागला होता.गावातल्या वाचनालयात रविवारी आणि शाळेतल्या पुस्तकांवर तुटून पडायचो.कित्येक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचली.संगणक म्हणून नविनच विषय आठवीला आला होता त्याची सगळी वही रिकामी कारण सर पुढे शिकवत असताना मागे पुस्तक वाचत जायचो.एकदा सरांनी वही तपासणीसाठी घेतल्या आणि मला शिव्या पडल्या त्या दिवशी एवढा रडलो होतो की तो क्षण अजूनही जिवंत वाटतो.
इतिहासाचा तास दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर असायचा मग आम्ही जेवण करून ठरलेल्या जागी जमायचो आणि बांबूची लांबलचक तिखट बाॅबी आणि रूपायाच्या लस्सीच्या पेप्सीवर दररोज ताव असायचा.गृहपाठ राहीलेला असल्यावर तर मग रमत गमत यायचो.अर्धा तास झालेला असायचा तरी वर्गात गेल्यावर सर गृहपाठाची आठवण करून देऊन चोप द्यायचे.
इंग्रजीच आणि माझ तस सुरवातीपासूनच वाकड आणि त्यात "इंग्रज चले गये औलाद झोड गये" या म्हणी प्रचलित असल्याने इंग्रजी शिकवणार्या शिक्षक आमच्यासाठी ब्रिटीशकालीन गव्हर्नर बनून जायचे.मुद्दाम खोडी काढण,चेष्टा करण,भरभरून हसण असा रोजचा कार्यक्रम आम्हाला स्वातंत्र्यपूर्व चळवळी वाटायच्या.सर पर्यायाने मला आणि माझ्या जिगरी मित्राला अंगठे धरायला लावायचे तरी कानात "अंग्रेज चले जाव " असा सारखा घोष चालायचा आणि आमच्या भूमिगत (उदा:- अंगठ धरायला लावल्यावर पोरांना चिमटे काढणे इ.) मोहीमा चालू असायच्या.आता मागे वळून पाहील्यावर आपण इंग्रजीच्या खुप मोठ्या संस्काराला मुकलोय आणि म्हणून NCERT ची पुस्तक वाचताना क्षणाक्षणाला अडथळा आल्यावर काळाच्या जबड्यात हात घालून परत मागे जाऊन सगळ काही मन लावून शिकून घ्याव अस आतून वाटायला लागत.
ययाती,छावा,पानिपत,मृत्युंजय,एक होता कार्व्हर,श्यामची आई,बाबुलमोरा,घरभिंती, झोंबी,आमचा बाप अन आम्ही इ. कित्येक डझनभर पुस्तक आम्ही दोन तीन बैठकीत सातवी आठवीच्या वयात वाचून संपवायचो. आता डिजीटलच्या जमान्यात आम्ही एवढे विकसीत झालो की पुस्तक वाचायच म्हटल तरी डोळ्यावर झापड येत.
आजूबाजूंच्या भावादिकांच्या शाळेतले किस्से रात्री निवांत रंगवून सांगताना कित्येक तास पोट धरून हसायचो.गाण्यांच्या,नावांच्या आणि गावांच्या भेंड्या असला कार्यक्रम रात्रभर चालू असायचा आता टिव्हिवरच्या मालिका चालू होतात आणि नाटकी कथानकात रमताना आयुष्याचा जीवंतपणा हरवून बसतो.
मला पक्क आठवत दहावीपर्यंत प्रेमाबद्धल गूढ आकर्षण आम्हाला असायच म्हणून आयुष्यात कधीतरी प्रेम करायच अशो मनाशी पक्की खुणगाठ बांधलेली होती.कधीकधी प्रेम व्हायच पण ते उगाचच मनात उकळ्या फुटायच्या म्हणून..लगेच काही दिवसात आम्ही सावरायचो आणि परत रूटीन अभ्यासाच्या गाडीवर लक्ष केंद्रीत व्हायच.या सगळ्यात कित्येक मुलींशी मनमोकळ बोलायचो,डब्यात जेवायचो पण डोक्यात कसलच काही नसताना होणारे स्पर्शाच काहीच वाटायच नाही.आता व्हाॅट्सअॅपवरून असल काही भडक आमच्या टाळक्यात भरल जात की प्रेमापेक्षा वासना आमच्या मेंदूत घर करून बसते...
संस्काराच पुतळा आम्ही होतो वगैरे काही म्हणत नाहीच फक्त सांगायचच झाल तर शहाणे तेवढेच होतो आणि नालायकही...
पण आता शाळेतल्या पोरांकड बघीतल की त्यांच्यातला पोरकट जीवंतपणा हरवून बसलाय अस वाटत
कदाचित मी मोठा झालो असेल????
किंवा मुलांची समज????
#क्रमशः
शुभम काकडे