Image may contain: 1 person, smiling, baby and closeup
रिलेशन आणि पोजिशन माणसाच्या दुःखाची मुळ आहेत" अगदी खर ना.....
नात वगैरे काहीच नसत
फक्त भूमिका जगत असतो. 
लहानपणी आईचा मुलगा,काॅलेजमध्ये मित्र,प्रेमात प्रियकर आणि लग्नानंतर नवरा अशा कितीतरी भूमिका जगत असतो आपण आपल्या नकळत.......
शेवटी भूमिका बजावताय मग पात्राला योग्य न्याय देता आला पाहीजेच की,
फक्त आपण वेगळ आणि आपली भूमिका वेगळी....
भूमिकेतल्या प्रियकराला होणारा त्रास तुम्हाला होऊच द्यायचा नसतो....
तुम्ही माणूस म्हणून नेहमीच वेगळे असता
तुमच्यातल्या त्या माणसाला कधीच वेदना जाणवत नाही तो नेहमीच शांत असतो......
समजा तुम्ही आदिवासी भागात राहता तेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप समृद्ध आणि श्रीमंत असता तर शहरातल्या चकचकीत माॅलमध्ये तुम्ही गरीब असता....
शेवटी काय तुम्ही आजूबाजूच्या माणसांनुसार रियॅक्ट करू लागता
वास्तवात प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून सारखाच असतो
फरक असतो तो फक्त पात्रात
पात्र आज उद्या नक्कीच बदलेल ,
बदलत नाही तुमच्यातला माणूस.....
तुम्ही श्रीमंत आहात आणि श्रीमंतच राहणार...
गरज आहे तुमच्यातील पात्र आणि माणसाला समजून घेण्याची.........
शुभम काकडे