पार्टनर
प्रियाचा फोन का आला नाही ? हा प्रश्न बराच वेळ महेशच्या मनात डोकावून जातो,पण त्यावर विचार करायच्या आतच एसटी वेग पकडते.विंडो सीट भेटली होतीच.जीव गुदमरून जाऊ नये म्हणून त्याने खिडकी उघडली खरी,पण दोन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग त्याच्या समोर उभी राहिला.गाडी सुसाट पुढे धावत होती महेश मात्र चाकासारखा मागच्या आठवणीत रेंगाळू लागला.तो क्षण होताच तसा कधीच विसरता न येणारा...
काॅलेजच्या लायब्ररीत त्या दिवशी बरीच गर्दी होती.महेश गर्दीतून वाट काढत सवयीप्रमाणे अवांतर वाचनाच्या रॅकपाशी पोहोचला.पुस्तक वाचणं हे महेशसाठी अगदी श्वासइतक सहज होत.शाळेत असतानाच बरीचशी पुस्तक त्याने हातावेगळी केली होती.रॅकसमोरच्या टेबलावर पुस्तकांचा भला मोठा ढीग पडलेला.चष्मा घातलेली एक सडपातळ मुलगी रॅकमधील काही पुस्तक काढून चाळत आणि टेबलावर भिरकावत होती.महेशची प्रियासोबत झालेली ही पहीलीच पाठमोरी भेट.गोंधळलेल्या मनस्थितीतील प्रियाची नकळत नजरानजर होताच महेशनं शेवटी पुढाकार घेतलाच..
"तुम्ही काही शोधताय का ?"
"हो.वपुंच 'पार्टनर'पण,काही केल्या सापडत नाही हो."
प्रियाचा रडवेला आवाज आणि बोलण्याची लकब पाहून महेशला गंमत वाटली.तो समोरच्या रॅकपाशी पोहचला आणि थोडीफार पुस्तक सरकावून एक पुस्तक काढत प्रियाच्या हाती दिल.
"हे घ्या.तुमच 'पार्टनर'"
प्रिया अगदी अवाक होऊन महेशकडे पाहू लागली.
"अहो आश्चर्याच काही नाही.मी लायब्ररीत पडीकच असतो.पुस्तकच काय यातली कित्येक पात्रही माझ्या जवळची आहेत"
महेशच हे अर्ध डोक्यावरून गेलेलं तरिही तेवढच रसाळ बोलणं ऐकून प्रियाला हे असच चालू रहावं अस वाटून गेल.
"थँक्यू हा.गेली एक तास शोधत होते पुस्तक.तुम्हीतर अगदी झटकन शोधून दिलत"
प्रियान महेशकडे बघत हलकस स्मित केलं.
"वेलकम,बर मला जाव लागेल माझी लेक्चरची वेळ झालीय"
"हो नक्कीच..सो पार्टनर ?"
महेशला हे शब्द कानावर पडताच क्षणभर धक्का बसला.प्रियालाही आपण नकळत काय बोलून गेलो याचा अंदाज आला.
"साॅरी मला फ्रेंड म्हणायचं होत.
सो फ्रेंड?"
महेशन क्षणाचाही विलंब न लावता प्रियाच्या हातात हात दिला.
"पार्टनर (पाॅज घेत) साॅरी फ्रेंड"
महेशच्या या मिश्किल स्वभावाला दोघंही खळखळून हसले.
कॅम्पस मध्ये यानंतर हळूहळू दोघांची भेट वाढू लागली.कॅन्टीनमध्ये गरमागरम चहा घेत गप्पा मारणं,लायब्ररीत पुस्तक चाळण हे अगदी रोजचच होऊन गेल.दोघ एकमेकांच्या प्रेमात कधी पडून गेले हे दोघांनाही समजल नाही.रागवण,भांडण,रडणं हे सगळं चालू असताना दोघेही मात्र एकमेकांच्या जास्तच जवळ येत होते.दोघांनाही आपण एकमेकांच्या प्रेमात असणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट वाटायची.व्हेलेंटाईन डे ला 'चौपाटी च्या उथळ समुद्र डोळ्यात साठवत प्रियाच घेतलेलं रसाळ चुंबन..
महेशच्या अंगावर या आठवणीनं अचानक सरसरून काटा सरसावून गेला.
आज बरोबर या 'रिलेशनशीप'ला दोन वर्ष पूर्ण होणार म्हणून काॅलेज पलीकडच्या बागेत भेटायचं दोघांच ठरलं.महेशने प्रियाच्या आवडीचा गुलाबी कलरचा टाॅप आधीच घेऊन ठेवलेला.प्रिया ठरल्याप्रमाणे बागेत पोहचली पण महेशचा पत्ता नाही.
बराच वेळ गेल्यावर शेवटी वैतागून प्रियानं मोबाईल काढलाच.
"महेश कुठे आहेस तू?आणि किती वेळ झाला?तुला समजत नाही का?निदान आज तरी मला भांडण नकोत?"
एवढ्या प्रश्नांनी महेशला दडपण आल.पण तो शांतच राहीला.
"प्रियू साॅरी.अचानक घरून फोन आला
..."
महेशच बोलणं पूर्ण होण्याआधीच प्रियानं फोन कट केला.
महेशन बराच वेळ ट्राय करूनही प्रियान मात्र काॅल रिसिव्ह केलाच नाही.
दोघांचा हा दोन वर्षांचा प्रवास आणि शेवटच्या मिनीटापर्यंतचा संवाद महेशला झरझर आठवून गेला.खिडकीतला वारा आता बराच थंड झाला होता.अचानक वार्याची झुळूक अंगावर येताच महेश भानावर आला.एसटी भर वेगात असताना आपण या आठवणीत रमून गेल्यानं त्याला स्वतःचच हसू आल.अचानक त्याला खांदा थोडा जड वाटू लागला.
नवरा गेल्याचा धक्का बसून वेडसर झालेली महेशची आई,त्याच्या खांद्यावर विसावली होती.आज आईसाठी हाॅस्पीटलची शेवटची अपाॅयमेंट झाली .एसटीतल्या इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्याने आईचे दोन्ही हात हातात घट्ट पकडून ठेवले.मधेच जाग येऊन आई शेजारच्या प्रवाशांना मोठ्याने शिव्या देऊ लागली.महेश आईला काहीतरी बोलून तिची समजूत घालत खांद्यावर झोपायला सांगे.आता महेशचा खांदा दुखू लागला.एसटीतील सगळेच रमेशच्या वागण्याकडे तिरप्या नजरेने बघत असल्याने त्याची घुसमट वाढू लागली.
फोनचे रिंग वाजल्यावर त्याने थरथरत्या हातांनीच काॅल उचलला
"महेश काय करतोयस"
प्रियाचा आवाज ऐकून महेशला हायस वाटल
"काही नाही बघ एक सुंदर मुलगी शांतपणे खांद्यावर झोपलीय"
महेशच्या या विनोदी स्वभावानं प्रिया राग केव्हाचा विसरून खळखळून हसली.
महेश मात्र अवघडलेला खांदा सावरत.रडणं आवरू पाहत होता.
(फोटो प्रतिकात्मक आहे)
शुभम काकडे