मराठी पत्रकारिता किंवा अन्य तत्सम माध्यम अभ्यासक्रमात पत्रकारितेची नितीमूल्य आणि बातमीमूल्य अगदी उबळ येईपर्यंत शिकवली जातात.वृत्तपत्र या पारंपारिक जनसंज्ञापनाच्या माध्यमात काम करताना या नैतिक समीकरणांचा फायदा व्हावा अशीच धारणा असते. डिजिटल आशयापेक्षा छापील मजकूरावर आजही अधिक विश्वास दाखवला जातो. मानवी जीवनाची जडणघडणच अशाप्रकारे झाली असावी.
बाळशास्त्री जांभेकरांच्या 'दर्पण' या मराठी वृत्तपत्रापासून सुरू झालेला हा प्रवास अगदी द्वितीय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. दरम्यानच्या काळात विविध बदलांना आणि विशेषतः डिजिटल माध्यमाचे तगडे आव्हान टिकवून वृत्तपत्र अजूनही उभी आहेत.
वृत्तपत्र माध्यमातून होत असलेलं वार्तांकन ही काही घटनांच्या बाबतीत संशयास्पद ठरते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल एका राजकीय गटाकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जातोय. हे सगळ घडत असताना मराठी वृत्तपत्र या घटनेकडे कसे पाहतात हे बघणे गरजेचे आहे. बातमीच्या मांडणीवरून वृत्तपत्राचा दृष्टीकोन समजून घेण्यास मदत होते. म्हणूनच आज मुख्य प्रवाहातील काही मराठी वृत्तपत्रांनी बातम्यांतून सदर घटनेचा केलेला आढावा समजून घेऊ...
१ महाराष्ट्र टाईम्स
महाराष्ट्र टाईम्सने ठळक अक्षरातच 'दोन संघटना भिडल्या' असा शब्दप्रयोग केला आहे. हा शब्दप्रयोग तथ्यहिन वाटतो. उपलब्ध असलेले व्हिडीयो फुटेज किंवा वृत्तसंस्थाच्या माहितीवरून विद्यापीठातील घुसखोरांचा हल्ला पूर्वनियोजित होता हे सहजपणे लक्षात येईल.'आरोपी विरूद्ध पिडीत' अशी परिस्थिती असताना टाईम्सने मात्र उत्तम मध्य साधला आहे. विशेष म्हणजे हल्ला हा एका विशिष्ट गटाने केलेला असताना 'एका मास्कधारी व्यक्तीने विद्यार्थी आणि शिक्षकांना जबर मारहाण केली' हे घटनेचे वर्णनही हास्यास्पद वाटते. बातमीसोबत छापलेला अगदीच साधा फोटोही वृत्तपत्राच्या भूमिकेविषयी बरंच काही बोलून जाईल. घटनेची पार्श्वभूमी,प्रत्यक्षदर्शीचे मतं घेण्यापेक्षा घटनाक्रमाचा धावता आढावाच बातमीच्या मांडणीतून दिसून येईल.
२. सकाळ
वृत्तपत्रातील दोन गटांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप हा मुद्दा अगदीच रास्त आहे. 'समाजकंटकांच्या हल्ल्यात जेएनयूची अध्यक्षा आईशी घोष गंभीर जखमी' हे मात्र परस्पर विरोधी विधान वाटते. स्वतः घोष माध्यमांशी बोलताना एबिव्हीपी या विद्यार्थी संघटनेचे नाव घेत असेल तर ते तंतोतंत छापणे गरजेचे होते. बातमीला काही अर्थी संतुलीत बनवण्याच्या नादात हे तथ्यपूर्ण वार्तांकन झाले असे म्हणता येणार नाही. बाकी बातमीची मांडणी योग्यच म्हणावी लागेल.
३. लोकमत
४. पुढारी
एखाद्या व्यक्तींचा खून आणि पैशांची किंमत हा घटनाक्रम राज्याच्या जनतेवर प्रभाव टाकत असावा अस पुढारी वृत्तपत्राचा समज झाला की काय अशी शंका येते. म्हणूनच जेएनयूचा घटनाक्रम वृत्तपत्राला कणभरही छापू वाटला नाही. शेवटी हल्ला,खून,दरोडा,हाणामारी हेच या वृत्तपत्राचे प्रमुख बातमीमूल्य आहे.जेएनयूच्या बाबतीत या शब्दांचा आधार घेऊन बातमी करायला हरकत नव्हती असो...
५. सामना
ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आणि शिवसेनेचे मुखपत्र म्हणून सामनाची ओळख आहे. जेएनयूचा उल्लेखही न करून सामनाने हिंदुत्ववादाच्या अजेंड्याला अप्रत्यक्ष समर्थनच दिल्याची अटकळ वाचकांनी बांधायला हरकत नाही.
६. लोकसत्ता
शुभम काकडे





