मोरपीस फिरताना...
लोकलचा आवाज कानाच्या पडद्याआड ठणकू लागला.हातपाय पसरायला पुरेल एवढ अंग दुमडून झोपल्याने शरीर अवघडून आल होत.घड्याळात पाहील तर सहाचा ठोका धडधड करत होता.रात्रीची झोप अंगावर मोरपीस फिरवून स्वप्नांच्या जगात प्रवेश करायला जाणार,तेवढ्यात ही लोकल रमेशच्या स्वप्नांची राखरांगोळी करत अंगावरून गेली.
लहान असतानाच आईवडलांच छत्र हरवून बसलेला रमेश मामाकडेच लहानाचा मोठा झाला.किडमीडीत शरीर असतानाही शाळेत तरबेज निघाला.काॅलेजचा खर्च मजुरी करणार्या मामाकडून पेलवणार नाही हे उमजूनच रमेश मुंबईच्या वाट्याला लागला.मिलींद काॅलेजमध्ये कला शाखेला प्रवेश घेत हाताला मिळेल त्या कामावर गुजराण करू लागला.रात्री अंग टाकण्यासाठी कुर्ल्याच्या एका जुनाट खोलीत बस्तान बांधून झाल.
काल सबंध रात्र चॅटींग करण्यात गेली.समीधाशी मैत्री होऊन महीनाच झाला असेल पण तीचा चेहरा आठवला तरी रमेशच्या मेंदूवर बधीरता चढायची.समीधाच हसण दिसण आणि सभोवताली असणच रमेशला मंत्रमुग्ध करून टाकायच.लायब्ररीत पुस्तक शोधताना झालेली मैत्रीण.वाचन हा दोघांचाही स्वभावधर्म असल्याने भेटीगाठी वाढू लागल्या.पुस्तकाच्या पानातल्या संदर्भात हरवत जाताना एकमेकांच्या मनं कधी व्यक्त करून झाले हे दोघांनाही समजल नाही.मागच्या आठवड्यात बागेत भेटताना नकळतपणे एकमेकांचा हातात आलेला हात दोघांची तार जुळल्याच उलगडत होतं.रमेशच्या
हाताची समीधाला तक्रार नव्हती, उलट तीचा गुलमोहर फुललेला चेहराच मैत्रीपलीकडच्या नात्याची साक्ष देत होता.
समीधाचा मॅसेज खणाणला तेव्हा रमेश नुकताच बिछान्यावर पहुडला होता.
"रमेश माझ तुझ्यावर फार प्रेम आहे उद्या कॅन्टीनला भेटशील सोबत तुझा होकार असेलच लव यू डियर"
मॅसेज वाचताना नितळलेल पाणी डोळ्यात ठेवत रमेश हुंदके देत रडू लागला.एकटेपणाच्या जगातून नवा माणूस सुखदुःखात सामील होण हे नात्यांपासून पोरक्या झालेल्या रमेशला हळव करून गेल.समीधाच्या कुशीत जाऊन मनमोकळ रडाव अस रमेशच्या मनात उफाळून आल.शरीरावर मोरपीस फिरवण कशाला म्हणतात हे बहुतेक त्याला समजल असाव.समीधाच्या रसाळ मिठीत शिरून मधाळ चुंबन घ्याव तसा त्याचा मादकपणा बहरून आला होता.अचानक अंगावरून साप फिरावा तसा तो शहारून आला. शरीराचा जाळ होतोय अशी त्याची अवस्था झाली.घामाच्या धारा वाहू लागल्या.श्वास कोंडला गेला.अडखळत थरथरत्या हातांनी गादीखालच्या दोन गोळ्या काढून त्याने तोंडात कोंबल्या तेव्हा कुठे त्याची तरफड थांबली."आई वडीलांसारखा तूही एचआयव्ही बाधीत आहेस" हे डाॅक्टरांचे शब्द कित्येक वर्ष झाले तरिही कानांवर आदळतायेत असा त्याला भास झाला.हातापायांच्या काळवंडल्या शरीराकडे एकवार बघत मोबाईलमधील समीधाच्या फोटोकडे पाहताच त्याच्या डोळ्यांचा बांध फुटला नकळत झोपेच्या स्वाधीन झाल्याच त्यालाही समजल नाही.
लोकलच्या आवाजान झोपमोड झाली.माणसांचा गलबलाट ऐकू येत असला तरिही रमेश आतून शांत होता आता त्याला उठावच लागेल कदाचित लोकल प्लॅटफाॅर्मवर येतच असावी.
शुभम काकडे