एसटीत जागा मिळवण्याच्या टिप्स 
"लोकलप्रमाणे एसटीत चढणे"ही अजब प्रकारची कला आहे.एक वर्षाच्या दिर्घ अपडाऊन नंतर ही कला माझ्या नसानसात भिनली गेली आहे.एसटीत कामधंदा नसल्याने टाईमपास म्हणून सदर लिखाण पोस्टाळत आहे......
एसटीत चढण्यासाठी आवश्यक दहा पायर्या
पायरी-१ :- मुंबईकर लोकलची वाट पाहतात अगदी तशीच फलाटावर जाऊन उभे रहा. शेजारी मोकळी जागा असली तरिही आजूबाजूच्या माणसांना ढकल जागा करा.(यामुळे होत काही नाही पण एसटीत चढण्यासाठी आपल्यासोबत किती स्पर्धक आहेत आणि किती दाब सहन करावा लागणार आहे याचा अंदाज येतो.)
पायरी-2 :- अतीशहाणा असलात तरिही फलाट क्रमांकावर पाटी वाचून घ्यावी.नाहीतर बारामतीला जायच सोडून दुबईला जाल ( दुबई हा शब्दप्रयोग लिखाणातील अतिशयोक्ती होती 😂असो )
पायरी-3 :-आलेली प्रत्येक एसटी आपलीच असून तीच्यामागे धावू नये नाहीतर अन्य इतर प्रवाशांना तुमची बालिशबुद्धी समजून येते
पायरी-४ :- स्थानकावरील मुली मुले फेरेवाले भिकारी पोलिस वगैरे प्रवाश्यांना उगाच टक लावून पाहण्याचा मुर्खपणा करू नये.तुमच्यासमोर एकच लक्ष असावे ते म्हणजे तुमची एसटी(जर हे शक्य नसेल तर संदीप माहेश्वरीचे एकाग्रतेचे विडीयो'ज पाहावे फायदा जाणवेल).....
पायरी-५:- एसटी आल्यावर कुत्र्याचा आदर्श घेऊन जीव तोडून पळावे.हातपाय आडवे तिडवे घुसवून दार पकडण्याचा प्रयत्न करावा.
पायरी-६ :-प्रयत्न अपयशी ठरला तर हळूच दाराच्या कडेच्या गर्दीत घुसून पुढील माणसांना रेटण्याचा प्रयत्न करावा.अंगात जोर असेल तर आरामत आत घुसू शकता.
पायरी-७:-"गाडी रिकामीच आहे सावकाश जा"असा मोठा आवाज द्यायचा आणि सगळे हळू जायला लागले की आपण हळूच आत घुसायचे असा गंडवायचा युक्तिवाद
असेल तर एसटीत बसायला जागा मिळायचे जान्सेस वाढतात😂
पायरी ८ :- म्हातारी कोतारी बायका कालवा आणि आरडाओरडा करतील तरी विचलित होऊ नका.चित्त एकाग्र ठेऊन आत घुसण्याचा प्रयत्न करा.यश तुमच्याच पदरी पडेल (साॅरी "पदर नाही खिसा"😂)
पायरी ९ :-एखाद्या भल्यामोठ्या ठोकळा टाईप माणसाच्या पुढे सरकण्याचा प्रयत्न करायचा जेणे करून आत जायला ग्रीप सापडते
पायरी १० :- पॅन्ट न गळणारी असेल तर उत्तम अन्यथा एसटी सापडणे लांबच अन्य दुसरीच गोची येऊ शकते.....
अपवाद
सर्वात उपयुक्त सल्ला म्हणजे भारतीय नियमाप्रमाणे खिडकीतून आत कापड किंवा बॅग टाकल्यावर ती तुमच्या नावावर होते यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत फक्त जर एखादा आडदांड माणसाने वाकडे लावल्यास चारचौघात भांडायची किंवा अपमान सहन करण्याची तयारी असावी लागते..
तळटीप:-एसटीत दया येऊन बसायला जागा देणे वगैरे सगळ्या अंधश्रद्धा असतात ......
#अनुभवावरून
शुभम काकडे