आरआयपी फैजाबाद

कोरियन गणराज्याचा ख्यातनाम सियोल शांती पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्राप्त झाला.मोदींची आंतरराष्ट्रीय छबी शांती,सहकार्य प्रगती व मानवतावादी असल्यानेच निवड समितीने मोदींची पुरस्कारासाठी मोहर उमटवल्याचे स्पष्ट केले.कोरियन व भारत सरकार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा धागा म्हणूनही या घटनेकडे पाहता येईल.सध्या भारतात चालू असणारा दक्षीण कोरीयाच्या प्रथम महिला नागरिक किंग जोग सुक यांचा दौरा सुषमा स्वराज,फोगाट परिवाराच्या भेटीमुळे सर्वसाधारण वाटत असला तरी,शरयू नदीच्या तटावर योगी आदीत्यनाथ यांच्या घोषणा मात्र दिवाळीच्या उत्साहात भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला सुरूंग लावण्याचा प्रकार ठरला.लोकांच्या कट्टर धार्मिकतेला खतपाणी घालून देशाच्या एकात्मतेला फूट पाडण्याच्या प्रयत्नात शांतताप्रिय कोरियाचा मात्र बळीचा बकरा बनवला गेला अस बोलले तर वावगे ठरणार नाही.
आगामी निवडणूकीच्या धर्तीवर राजकारण गरम असताना विकासाच्या जोरावर निवडणूक लढवायची.तर सरकारला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून ज्या मुद्द्याचे बोट पकडून सरकारने सत्तेचे पाणी चाखले त्या 'राम नामाचा जप'पुन्हा एकदा चालू झाल्याचे दिसून येते.राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असताना वाचाळवीर सरकारच्या काही नेत्यांची वक्तव्य आणि शरयू तटावर "एक दिया राम मंदीर के नाम" चा जयघोष पाहता देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच डगमगळीत झालाय की काय अशी शंका येते."सबका साथ सबका विकास" चा नारा देतानाच अल्पसंख्याकांच्या मनातील भिती सरकारच्या दडपशाही द्योतक असल्याचे समजून येईल.
अयोध्या भारतीय संस्कृतीच धार्मिक श्रद्धास्थान आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही.अगदी ॠग्वेदातील इंद्राने दोन आर्यांचा वध केला तो शरयू तटावर तर दशरथ राजाची राजधानीच अयोध्या होती.बाल काण्डातील उल्लेखाप्रमाणे विश्वामित्र ॠषींसोबत राम शिक्षणासाठी होडीतून शरयू नदीकाठातूनच गंगा संगमापर्यंतच पोहचले.कालिदासाचे रघुवंशम आणि तुलसीदासाच्या रामचरीतमानसातही अयोध्येचे गुणगान गाण्यात आले आहे.अगदी बौद्ध ग्रंथातही या नदीचा उल्लेख सरभ म्हणून करण्यात आला.चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असणारा ग्रीक राजा सेलिकस निकोटरचा राजदूत मॅगॅस्थिनीजही शरयू नदीचा सोलिम्मतीस नदी म्हणून उल्लेख करतो आणि अयोध्या परीसराचे रसाळ वर्णन करतो यावरून अयोध्या नगरी धार्मिक केंद्रबिंदू असल्याचे सहजगत्या लक्षात येते.
अशाच शरयू तटावर साजरा केला जाणारा दिपोत्सव योगी सरकार सत्तेवर आल्यापासून भव्यदिव्य होऊ लागला. गतवर्षी अडीच लाख दिवे पेटवून एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतू सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूका हाकेच्या अंतरावर असताना आणि लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असताना यावर्षीच्या दिपोत्सव धार्मिक न राहता त्याला राजकीय वलय प्राप्त झाले नसते तर नवलच.घडलेही तसेच यंदाचा दिपोत्सव तीन दिवसीय रंगीबेरंगी कार्यक्रमांनी भरगच्च होताच आणि त्याला राष्ट्रीय स्वरूप येण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून चक्क किंग जोग सुक यांना आमंत्रित करण्यात आले.राज्यातील प्रशासन या कार्यक्रमाच्या तयारीसाठी रात्रंदिवस काम करू लागले.शहरात मुख्य रस्त्यालाच असणारे खड्डे बुजविण्यात आले.डिजीपी ओपी सिंग यांना तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था काही दिवस बाजूला सारून फक्त दिपोत्सव साठी राबावे लागले.त्यात लखनौला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच असल्याने तणावात भर पडली.भारतातील सर्वात मोठा सिमेंटचा दिवा शरयू काठी बनवण्यात आला.अयोध्या लगतच्या जयसिंहनगर गावातील प्रत्येक घराला पाच हजार दिवे बनवण्याचे आदेश देण्यात आले.आता याला रोजगार निर्मीती म्हणाल तर त्यांच्याकडून अगदी नगण्य किमतीत हे दिवे विकत घेण्यात आले.हा सगळा घाट कशासाठी तर दिपोत्सवाची "गिनीज बुकात" नोंद होण्यासाठी.... जवळजवळ तीन लाख दिवे ४५ मिनीटे पेटवून ठेवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड.........
अस सगळ धांदलीत वातावरण असतानाच योगी सरकारने दशरथ नावाने मेडिकल काॅलेज,राम आंतरराष्ट्रीय विमानतळ व फैजाबाद जिल्हय़ाचे नाव बदलून अयोध्या करण्याचा निर्णय घेतला.(याआधीच इलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आले आहे) संतांना स्टॅच्यूपेक्षा राम मंदीर अत्यावश्यक असल्याची सूचना केलीच तर अयोध्या तन मन धन असून या नगरी वर अन्याय होऊ देणार नाही असा सूचक इशारा दिला.आता या सगळ्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपेक्षा महत्वाच्या असतील असे मानले तरिही धार्मिक उन्माद निर्माण उभारून जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी सोडलेले हे पिल्लू आहे हे समजून येते.
शेवटी दिपोत्सवतून पेटत्या अडीच लाख दिव्यातून चैतन्य उसळून आलेले असतानाच दुसर्या दिवशी उरलेल्या दिव्यातील तेल काढण्यासाठी मिळेल त्याने दिव्यातील तेल खरवडून काढणारी चिमुरडी व महिला पाहून चैतन्याच्या वातावरणात अस्वस्थतेची काजळी उतरल्याशिवाय राहणार नाही.शरयू नदीतील जलचर तर केव्हाच अखेरच्या घटका मोजताना दिसून येताहेत.शेवटी नाव बदलून,दिवा पेटवून विकास होत नाही एवढ मात्र नक्की.
राम मंदीराच्या मुद्द्यावरून एकमेकांची डोकी फुटतील,माणस मरतील पण रस्ता वीज शेती कुपोषण बेरोजगारी वगैरे मूलभूत प्रश्नांची रांग वर्षानुवर्षे तशीच राहील.उद्याच्या पिढीसाठी दगड उचलायचा की मूलभूत हक्कासाठी लढा उभारायचा ते शेवटी आपल्याच हाती आहे.
तूर्तास फैजाबादला जिल्ह्याला भावपूर्ण श्रद्धांजली....

शुभम काकडे