काॅललिस्ट... भाग 3
दिवसभराच्या पायपिटीने शिवाजी थकला होता.त्यात लोडशेडींगमुळे ऐन दिवाळीच्या काळोखात तो अंदाज बांधत पायर्यांवरून भरभर चालू लागला. अंधाराच्या छटांतून सावरत सावरत शिवा रूममध्ये शिरला.चाचपडतच काॅटवर आल्यावर शिवा निश्चींत झाला. दिवाळीची सुट्टी लागली होती काहितरी नवीन प्लॅन करणं आणि मित्रांना भेटणं हे तर ठरलेल असायचच. गेल्या दिवाळीला भिमाच्या घरी जायचा प्लॅन करून शिवा खापटेवाडीला गेला होता. शिवाच्या डोळ्यांसमोर तो दिवस जिवंत झाला तरी हातपाय थरथर कापू लागतात.
भिमाच गाव खेडेगावापेक्षा मागासवर्गात मोडणार.एसटी लांब खापटेवाडीत थांबली होती तिथून भिमाच्या वस्तीवर चालत जायला लागणार होत.गावात डांबरीकरणाचे शिंतोडे मारलेत की काय अशी शंका यावी एवढी रस्त्यांची वाईट अवस्था.... भारत देशाचा इतिहास उलटा वाचायचा असेल तर भिमाच्या गावातून वाट काढत खालच्या वस्तीवर चालत जाऊन सहज समजू शकतो अशी व्यवस्था सरकारने आणि एकूनच राहणाऱ्या समाजाने ठेवली होती. माझ्यासोबत आमचा बालमित्र विकास होता. त्याच्या घराण्याच्या चारही पिढ्या शहरातच घडल्यामुळे त्याला खेडेगाव नावाचा प्रकार समजून घ्यायचा होता. विरंगुळा होईल या उद्देशान त्याला
सोबत तर घेतल होत.पण विकासला आल्यापासून उमसायला सुरवात झाली होती.एवढ्यापर्यंत ठीक होत यानंतर मात्र वस्तीवरून जाताना खड्यात एके ठिकाणी पाय मुरगळून त्याला मुक्का मार लागला आणि त्यान जाग्यावर बैठक मारली.विकास कसाबसा पाय दुमडत चालू लागला "पुन्हा आयुष्यात कधीच तुझ्यासोबत येणार नाही" अशी शिवाला ग्वाही देऊन बोलू लागला शिवासुद्धा हसत हसत म्हणाला "बघ विकास कसा आहे भारत, तू इंडियात सहजपणे चालू शकतोस पण इथ लंगडावच लागत, दुसरा पर्याय नसतो ना" शिवाच फालतू तत्वज्ञान विकासच्या डोक्यात गेल्यासारखं त्यान कपाळावर आठ्या पाडल्या .
रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारांच्या काठांवर वसलेली बैठी घर पाहताना आणि शेजारच्या बोळांतून बायकांची भांडण कानावर झेलताना शिवाची अस्वस्थता वाढली होती त्यातल्याच एका बाईच्या तोंडातून आलेली शिवी ऐकून विकासच काळीज धडधडायला लागल होत... धुळखात बसलेल्या समाजमंदिरासमोर दाटीवाटीन बसलेली, मळखाऊ फाटकी कापड अंगावर असलेली तरूण पोर पत्त्यांचा डाव मांडून बसली होती शिवाला अचानक काॅलेजमधल्या भिमाचा चेहरा आठवू लागला "निटनेटकेपणा" भिमाच्या राहणीमानातून उठून दिसायचा. भिमाच घर जवळ आल होत पण नक्की घर कोणत याची विचारपूस करावी म्हणून शेजारच्याच एका तरण्याबांड मिसरूड्या पोराला भिमाच्या घराचा पत्ता विचारला. दाढीन भरून आलेल्या चेहऱ्यावरचा इवल्याशा ओठातला गुटखा शेजारी थुंकत अगदी राकट आवाजात तो बोलला "भाऊ समोरच हाय की बघा की नीट" अशा खोचक शब्दात उत्तर ऐकून शिवाला वाईट वाटल पण भिमाने बरचं काही समाजप्रबोधन केले होते की, आणि म्हणे लोकतर त्याच्या शब्दाबाहेर नव्हते मग ही अवस्था???
कदाचीत शिकवलेल्या वचनांचा अर्थ काढायला चुकले असतील लोक ,म्हणजे "बिघडण्यासाठी शिकायचं,एकमेकांची डोकी फोडण्यासाठी संघटीत व्हायच आणि हातपाय तुटेपर्यंत संघर्ष करायचा" एवढचं.....
समोरच पत्र्याची पालं चारीबाजूला लावून शेणामातीन सारवलेल भिमाच्या घरात पाऊले टाकताच भिमा कावराबावरा झाला त्याची बायको लगबगीने चहा टाकायला गेली. भिमा खाटेवर निजला होता. आदरातिथ्यासाठी उठायचा प्रयत्न करताना शिवानं त्याला आधार दिला आणि भिंतीच्या आधारान टेकून बसवल.काही क्षण सगळेजण अबोल झाले होते.घर नजरेत बसल्यावर विचारायच म्हणून शिवा म्हणाला "भिमा पुस्तक भरपूर ठेवलीस हं घरात, पण बुद्धाची मूर्ती न्हाय ठेवलीस" भिमा हसत हसत म्हणाला "मूर्ती घरात कोंडून बुद्ध थोडीच वाचता येतो त्याला पुस्तकांच्या पानातून कदाचित थोडाफार तरीत्याून घेता येईल " यावर तिघेही खदखदून हसले...
विकासला अचानक संस्कृतीचा फोन आला.या दोघांचही लग्नात अक्षता पडल्यापासून आजतागायत पटल नव्हत.विकासनं इंजिनिअरिंग केल होत आणि संस्कृतीने बिए. शिकून सवरून अजून टीपिकल नवरा बायको सारख भांडण दोघांचही चालूच होत. विकास तावातावानेच हताश होऊन घराबाहेर जायला निघाला जाताना "एक मिनीट हं" म्हणताना त्याच्या चेहर्यावरचे एकूण भाव परिस्थिती सांगून गेले आणि तो घराबाहेर पडला. मग खोलीत कुणीच नव्हत ही संधी साधून शिवाच्या मनात खोलवर रूतलेला प्रश्न विचारावा या हेतूने शिवा बोलू लागला
"भिमा एक विचारू का"
भिमा हसत म्हणाला
" परवानगी काय मागतोयस,विचार ना"
शिवान आपला एक हात भिमाच्या हातात हात देत तो थोड्या अस्पष्ट आणि खालच्या आवाजात बोलला
"तुझी ही अवस्था कशी झाली?"
क्षणभर गतकाळातल्या आठवणी भिमाच्या डोळ्यांसमोर रेंगाळू लागल्या काही गोष्टी कितीही कोंडल्या तरी प्रकाशाच्या कवडश्यातही त्या झरझर बाहेर पडू लागतात अशी भिमाच्या मनाची अवस्था झाली तो भरभर सांगू लागला "तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही
#क्रमशः
शुभम काकडे