नाळ समजून घेताना
फॅड्रीला शिव्या वाहणार्यांनी सैराट डोक्यावर घेतला आता नाळ पचनी पडायला त्रास होईलच कारण मसाला,तडका,थ्रील,धांगडदिंगा एवढ्यापुरते चित्रपट साक्षर असणार्या दर्शकांना दृश्यांची भाषा संवेदनशीलता आणि नात्यांचा संमिश्र खेळ समजणे जरा अवघडच.नागराज चित्रपटाचा दिग्दर्शक नाही हे सुरवातीलाच स्पष्ट करण गरजेच कारण नागराजचा चित्रपट असा गाजावाजा सगळीकडे झाल्यामुळे सामाजिक विषमता जातीयता यावर दगड मारणे,रक्ताचे पाट वाहणे असल काहीस अंगावर येणार सिम्बाॅलिझम पहायला भेटणार असा समज बहुतांश प्रेक्षकांचा झाला असणार पण तसा नागराजचा चित्रपट नसला तरी संवादलेखन आणि आटपाटची जादू चित्रपटाच्या प्रत्येक क्षणी बघायला भेटते.
देऊळ सैराट इ. गाजलेल्या चित्रपटांचे सिनेमेटाग्राफर सुधाकर रेड्डी दिग्दर्शक म्हणून पदार्पणातच नाळ सारखा माईल्डस्टोन प्रेक्षकांसमोर ठेऊ शकले कारण चित्रपट ही चित्रांची भाषा असते हे सहज गणित रेड्डींना दिग्दर्शनातून सहजगत्या उलगडता आले. पटकथा संवाद आणि कलाकार सर्वगुणसंपन्न असतानाही कथेला भडकपणा मसाला ड्रामॅटीक बनवण्याचा मोह टाळून कथेतील तरलता शेवटपर्यंत कायम ठेवण्यात नाळ टीम यशस्वी ठरली एवढ मात्र नक्की..
बाळ जन्माला आल्यावर त्याची नाळ कापली जाते.बाळंतीण महीलेसाठी हा अत्यंत अवघड प्रसंग असला तरी एका जीवाचा नवांकुर फुटण्याचा तो क्षण असतो.गावातून शिकून सवरून शाळेत जाणार्या पोराला गावाची आणि मातीची नाळ तोडू नको अशी सल्ले देणारे म्हातारी-कोतारी एवढच काय तर गावातील नवा टुमदार बंगला झाला तरी काठीला टेकलेली माणस अडगळ झोपडी सोडायला तयार नसतात कारण कळत-नकळत अशा काही गोष्टींशी आपल घट्ट नात जोडल जात जे आयुष्यभर चिकटून राहत काही गोष्टी सुटता सुटत नाहीत ना त्यातलाच हा एक प्रकार......
चित्रपटातला नाळ असाच संवेदनशील विषय असून तो आई-मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. असे बहुतांश रिव्ह्यू मधून समोर आल ते योग्यच आहे. परंतू यापलीकडे नाळ उलगडायला गेला तर विवीध अंगांनी तो समृद्ध ठरतो.आजकाल मराठी चित्रपटात पाहतो की प्रेम मैत्री विनोद (वगैरे सर्व शुद्ध पुणेरी)यापलीकडे कशाचीच पर्वा नसणारी आणि शहरी जीवनाच गोडगोंडस चित्र उभी करणारी(गुलाबजाम तूहीरे मीतवा सतरंगीरे...अप टू इन्फीनीटी) शहराळू मंडळी कधी नव्हे ते सामाजीक चित्रपटाच्या नावाखाली गावातल्या रंगीबेरंगी झोपड्या,हिरवीगार शेत,शुद्ध हवा असल आर्टिफीशीयल गाव उभ करून पैसा कमावतात.ते चूकीच करतात अस म्हणतच नाही त्यांनाही स्वातंत्र्याचा अधिकार आहेच की,पण आपला गाव त्यांच्या गावापेक्षा लाख पटीने सरस आणि अनुभवांनी समृद्ध आहे हे नाळ पाहून समजून येईल मग कुठे घरात पहायला भेटणारी हातापायावर सुरकुत्या पडलेली म्हातारी,घरातल्या बायाबापड्यांना करावी लागणारी धारा काढण,दळण,मळण,कोंबड्या गुर सांभाळण,म्हातारी माणसांच दुखण खुपण बघण,धुणी,भांडी,अशा नाना गोष्टी अखंडपणे न थकता करतात अशा बायाबापड्यांची दुःख शहरातल्या मेमसाब सारखी गुळगुळीत नसतात मात्र आमच्या मराठी चित्रपटसृष्टीला अशा गुळगुळीत विचारसरणीने विळखा घातलेला दिसतो याला अपवाद म्हणूनच नाळ इतर चित्रपटांहून वेगळा ठरतो.
नाळ मधील माणस आपल्या आजूबाजूच्या माणसांसारख साधसुध संभाषण करतात.उगाच अलंकारिक,साहित्यीक(थोडक्यात फिल्मी) भाषा चुकूनही आढळत नाही.याउलट अर्धा चित्रपट कलाकारांच्या देहबोलीतून उलगडला जातो यात तुलनाच करायची झाली तर लहानसा चैत्या इतर कलाकारांकडून सरस ठरेल.चित्रपटाच्या मागे रेंगाळत असणार पार्श्वसंगीत काळजाचा ठाव घेते.फिल्मची गाणी वेगळ्या धाटणीची आहेत अगदी चित्रपट पाहताना रडाव वाटत पण आपण आतूनच कुढत असतो खोलवर कुठेतरी जखम झाल्यासारख वाटत.एका लहान मुलाच्या मानसिकतेतून तुम्ही चित्रपट पाहत असतानाही तो प्रश्न आपलासा वाटून प्रेक्षक नकळत वाहवत जातो
नागराज आणि सिम्बाॅलिझम हे गणित नाळ मध्ये जास्तच खुलून आल.अगदी नदीचा कोरड पात्र,गावातल्या प्राथमिक सोयीसुविधांची वाणवा,वाळूतून बैलगाडीच्या चाकाच रुतून ठसा उमटवण,चैत्यान हिरा देऊन टाकण इ प्रसंगाचा गूढ अर्थ बर्याच प्रश्नांवर प्रकाश टाकतो.प्रेक्षक मुलांना शाळेत सोडणाऱ्या विक्षिप्त टमटमवर हसून लोटपोट झाले परंतु मुलांच्या शिक्षणपद्धतीची अवस्था गडद केल्याच भिषण चित्र म्हणून ती ओबडधोपड टमटम वापरल्याचे समजून येईल .चित्रकला आणि गोष्टी वाचायला आवडत असताना लहान वयातच जिकेफिकेचा रटाळ अभ्यासाची सक्ती का? काॅन्वेन्ट स्कूलच्या हट्टापायी कसलच इंग्रजी वातावरण नसलेल्या ग्रामीण मुलांच आपण किती मोठ्ठ नुकसान करतो? अशा प्रश्नांनी डोक जड होत.चित्रपटात अशा एकातून एक उपकथा फुलत जातात शेवटी प्रेक्षक म्हणून थक्क होणेच आपल्या हाती उरत.....
चित्रपटाची पटकथा सांगण्याचा मोह टाळतो कारण ते सिक्रेट असलेलच बर आणि स्टोरी सांगून फिल्म पाहण्याची चश्मा घालवली जाते अस वाटत.बाळाच्या नाळेतील रक्त जतन करून गरजेनुसार खराब पेशी किंवा शरीराचा अवयव निर्माण करणारी स्टेम सेल्स थेरपी करण्यात जशी नाळ उपयोगात येते अगदी तशीच मातीपासून फारकत घेऊन भरकटलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या विचारांची स्टेम सेल्स नाळ नक्कीच बदल घडवून आणेल एवढा विश्वास वाटतो
"आई हे एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेल गाव असत"
या फमुंच्या ओळी प्रत्यक्ष अनुभवायच्या असतील तर नाळ नक्कीच पहावा शेवटी नाळ प्रेक्षकांच्या मनात चिकटून राहील यात तिळमात्र शंका नाही
शुभम काकडे