ब्लाॅकलिस्ट
सुट्टीचा दिवस म्हणजे कंटाळा वामकुक्षी इडीयट बाॅक्सवर एकामागून एक चॅनलची सर्फींग वगैरे वगैरे आणि त्यात हाताला मिळेल ते खात राहण हा रमेशचा उद्योग.गादीवर लोळण्याचा निवांतपणा एरव्ही फक्त सुट्टीच्या दिवशीच नशिबी येतो नाहीतर काॅलेजात असताना जान्हवी सोबत मंतरलेल्या क्षणात काळ आणि वेळेच भान तसही त्याला राहतच नाही.व्हेनेझुएलात सत्तांतराचा प्रश्न असो की ट्रम्पच्या आर्थिक धोरणांचा यापेक्षा सुट्टीच्या दिवशी नक्की करायच काय?हा गहनगंभीर प्रश्न आ वासून रमेशपुढे नेहमीच उभा राहतो.
आईन केलेला शेवटचा शेंगदाण्याचा लाडू तोंडात टाकताच रमेशच्या दिशेने एक जोरदार आवाज भिरकला."ए रम्या जरा एक कुठलतरी लाव की.मघापासून नुसत चॅनील बदलतुया" तोंडातल्या रसाळ लाडूची चव अचानक कडवट झाल्याचे भाव चेहर्यावर दाखवत रमेश व्हिलनला बोलला "हो लावतो" "नुसती कटकट म्हातार्याची"(शेवटच वाक्य मात्र आजोबांच्या कानावर जाणार नाही व स्वतःचे गाल फुटणार नाही याची दक्षता घेतच बोलला ) शेवटी गंमत म्हणून इकाॅनाॅमिक्स टाईम लावून त्याच्याही फुटभर डोक्यावरून जाणारी भाषा डोळयांनी बघू लागला.तस त्याला इंग्रजी थोडफार जमत पण त्यांच्या एकामागून एक फेकून मारलेल्या शब्दांच्या अर्थाची गती जुळवता जुळवता त्याची मती भ्रष्ट व्हायची म्हणून न पेलणार आव्हान न स्विकारता रमेश मोबाईलच्या स्क्रिनवरच फटाफट टाईप करत जान्हवीशी बोलू लागला तसही व्हिलनची गंमत करावी म्हणून मुद्दामहून रचलेल हे इकाॅनाॅमिक्स टाईमचे शडयंत्र....
मोबाईच्या स्क्रीनवर खिळताच रमेशचा मुड स्वींग झाला.राग,चिडचीड व अशा अनेक भावांचे संमीश्र स्वरूप त्याच्या चेहर्यावर उमटले होते कारणही तसच होत बरेच दिवस रिलेशन्समध्ये राम नव्हता याआधी भांडण झाली होतीच एव्हाना प्रत्येक नात्यात हे साहाजीक घडत असत पण यावेळी परिस्थिती बिकट होती.ब्रेकपच्या उंबरठ्यावर येऊन कधीही दोघांच्या प्रेमाची कडेलोट होण्याची दाट शक्यता होती.(हवामान खात्याचा अंदाज असता तर कदाचीत यात बदल झाला असता)
शेवटी अघटीत घडलच दोघांनी ब्रेकअप करून टाकला. मॅसेज डिलीट करणं,स्टेटस हाईड करण,नंबर ब्लाॅकलीस्टला टाकणं, अशी क्रियाकर्म करून झाल्यावर जानूच्या शेकडो फोटोजने भरलेली गॅलरी भरभर रिकामी केली(कधी नव्हे ते गॅलरीचा गुदमरलेला श्वास फुलून तीला हायस वाटल असणार असो....!)
अस सगळ करून झाल की रमेशला थोडस मनमोकळ वाटू लागल."एकटा जीव सदाशीव" वगैरे कोटेशन्सच महत्व त्याला कधी नव्हे ते पटू लागल.काही वेळ जाताच काल्पनिक त्रासाच्या जगातून वास्तवात आल्यावर तो चकित झाला.कारण व्हिलन अजूनही इकाॅनाॅमिक्स टाईम्सच्या चॅनलवर नजर लावून होते.कुणास ठाऊक पण अचानक रमेशच्या अंगावर साप फिरल्यासारखा काटा उठला.आजोबांचे धीरगंभीर पाणावले डोळे बघताना त्याच्या मनात शेकडो प्रश्नांच जाळ विणल गेल.
आज्जी जावून जवळजवळ वर्ष होत आली पण तीचा प्रेमळ हात गालावरून फिरला तरी हायस वाटायच.अगदी सगळ्या दुःखाचा निचरा व्हायचा.आजोबा सुरवातीपासूनच घरात चेष्टेचा विषय म्हणजे प्रेम वगैरे होतच की,पण त्यांच्या काही गोष्टी फार गमतीदार असायच्या तर कधी एक काम करताना आज्जीसमोर दहा कामांचा पसारा उभ करण.हा आजोबांचा आवडता छंद.त्यामुळच की काय आज्जीन त्यांच नाव "व्हिलन" ठेवल होत.आज्जी असताना एकमेकांच्या गप्पाटप्पात रमताना आजोबांचा हसरा चेहरा आज्जी गेल्यापासून कोरडा पडला होता.एकमेकांना सावरत फुललेल्या संसाराच्या झाडाची मुळच सुकून जावीत तशीच काहिशी आजोबांच्या मनाची घालमेल त्याला स्पष्ट दिसू लागली.
दुष्काळ पडावा तसा चेहरा घेऊन आजोबा आता फक्त बसून असतात. आपल्याच घरात विस्थापीत झाल्यासारख कुणाशी जास्त बोलतही नाहीत खरच की!...आपण विचारच केला नाही,आजोबा वर्षभरात मनमोकळ बोललेच कुठ होते.दिवसभर या नकली पात्रांची चेहरे बघत बघत स्वतःच्या उतारवयातल पात्राचा विसरच त्यांना पडला असावा.
रमेशची छाती धडधडू लागली.आजोबांच्या पाणावल्या डोळ्याकड बघत त्याच शरीर थंड पडल होत."प्रेम जोडीदार" ही पात्र जगण्याला किती सुंदर बनवतात असा विचार त्याच्या डोक्याल शिवून गेला.त्याच्या मनात अस्वस्थतेचा तरंग उठून गेला.धडपडतच त्याने रिमोट घेतला.व्हिलनच्या आवडत्या बातम्या लावल्या.रमेशचा चेहरा प्रसन्न होता नकळत जगण्याचा खूप मोठा धडा तो उघड्या डोळ्याने पहात होता.
रमेशने मग क्षणाचाही विलंब न करता मोबाईलच्या ब्लाॅकलीस्ट मधून जान्हवीच नाव कमी केल.प्रेमाचा उमाळा फुटावा अस काहीस मॅसेजमध्ये पाठवून दिल. मात्र पलीकडच्या स्वारीकडून उत्तर नाही.मात्र रमेश प्रचंड आशावादी होता कारण नात्यात दुष्काळ असला तरी प्रेमाची ओल रमेशच्या देहाला जाणवत होती कदाचित प्रेमात उभ राहण यालाच म्हणत असतील..........
शुभम काकडे