गावठी शाईनटिष्ठ ऊफ्र स्वामीजी

विश्वाच्या चराचरातून हाहाकार उठला.इस्त्रो-नासा-जपानचायनाच्या हायटेक बायोलाॅजीकल कंपन्या,नेचर व लाईफसायन्सचे प्रख्यातविख्यात पत्रकार,ऑक्सफर्ड-केंब्रिज-स्टॅनफर्ड विद्यापीठातील फेलोशीपधारकमारक विद्यार्थी व जगाच्या गल्लीबोळात दिवसरात्र डोळ्यावर भिंगावर भिंग चढवत डोक्याची दही करून केसाची साय करणारे शाईनचिष्ट ..वगैरे सर्वांच्या नजरा भारत मातेच्या (वाचलो बाबा!)महामहीम भुखंडातील दिल्लीस्थित एका फकीरावर पडल्या.विशेष म्हणजे हा पत्रकारांच्या नजरेतील फकीर नव्हता!(या विधानाचा मुदीशेठशी काडीमात्र संबंध नाही) तर ज्ञान-अध्यात्माच्या लाखो चक्रातून भारतवर्षात अवतरलेला महापुरूष ज्याचा चेहरा प्रकाशाने लख्ख असून भारतवासीयांना तिमीरातून तेजाकडे नेणारा हा साधुसंत अर्थात सुब्रिमुनी स्वामी...
तर घडले असे की रात्री गाढ निद्रेत असता अचानक उबळ आल्याने स्वामी उठले.थोडस हायस वाटल्यावर गादीवर पडावे तर काही केल्य झोपच येईना.आता बियर टाकल्याशिवाय झोपेत "राम" नाही असा विचार करतच स्वामी ताडकन उठले.बियरची धार ग्लासात लावताना स्वामींच्या मनात गुदुगदू झाले.एक भक्कम पेग लगावल्यावर आत्मसाक्षात्कारांची जाणिव स्वामींच्या चेतासंस्थेतील कणाकणाला झाली.जवळच कित्येक दिवस पडलेल्या प्रबंधाचा कच्चा मजकूर उचलून "पप्पूंचा आत्मक्लेश" हे प्रकरण वगळून नवीन पानावर "प्रियंकाच्या ताटी"हा मथळा टाकीत अगदी शरीरातील झिंग उतरेपर्यंत कागदावर खरवडू लागले.हल्ली वयोमानाने जास्त जागरण होत नसल्याने एव्हाना ते झोपेच्या स्वाधीनही झाले.
सकाळी उठल्यावर डोळ्याची झापड उघडून पाहताना अगदी बेरक्या आवाजात "युरेका युरेका"ओरडत नाचू लागले.रात्रीची तपश्चर्या फळाला लागली.(बियरमाईची कृपा)
शाईनटीष्ट लोकांच्या नाकावर टिच्चून मारून 'बायपोलॅरिटी' नामक रोगाचा शोध स्वामींच्या कष्टाळू मेंदूत उपजला होता.या आजाराची लक्षण म्हणजे अशी माणस हिंसक होतात आणि लोकांना मारहाण करतात.प्रियंका ताईंना हा आजार झाल्याचा दाखला ते इंडीयन मिडीयात ओकू लागले."ढगाला आग लागली पळा पळा" या उक्तीचा आदर्श घेत मिडीया स्वामींच्या शोधाचा वणवा भारतभर पसरवू लागले.माॅब लिंचिंगच्या शेकडो केसेसपेक्षा मिडीयाला बायपोलॅरिटी प्रकरण भयंकर वाटल (इंडीयन मिडीया ग्रेटच?)
सगळी पांगापांग झाल्यावर स्वामींनी एकवार सुटकेचा सुस्कारा सोडला.रात्रभरच्या जागरणाने कंटाळल्या देहाला गादीवर सोडून द्याव या हेतूने स्वामी उठले असताच अचानक फोनची रींग खणाणली.नाखुशीनेच फोन उचलून समोरच्या चिल्लरपिल्लर कार्यकर्त्याला झापाव,असा मानस ठेऊन फोन उचलावा तर पलीकडे चक्क मुदीशेठ!....
दबक्या आवाजातच शेठने स्वामींना पुसले "स्वामीजी रामदेवबांच्या सूचनेचा मान राखीत कृषी क्षेत्रातील ट्रोल नामक पीकाला बायपोलॅरिटी खाद्याचा शोध लावल्याबद्धल पुढील वर्षीचा भारतरत्न आम्ही तुमच्यासारख्या साधुसंतांच्या चरणी अर्पण करीत आहोत."
मुदीशेठचा एकेक शब्द कानावर पडताना स्वामींची छाती व कान 'अॅट ए टाईम' भरून आले.आनंदाश्रूंची धारा डोळ्यावर लाऊन शेठची 'मन की बात' अभिमानाने ऐकू लागले.आभारबिभार मानून फोन ठेवून देताच स्वामीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.स्वामी आनंद मनातच ठेवीत बियरच्या टेबलापाशी सरसावले.स्वामींनी खुशीतच बियरचा एक पेग लगावला कदाचित ट्रोलच्या पीकासाठी नवीन संकरीत खाद्याचा शोध लावण्याचा त्यांचा मानस असावा असो!... तुर्तास झालेली सेवा गावठी शाईनटिष्ठ उफ्र स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि आपली रजा घेतो तुर्तास "जय श्री राम"
शुभम काकडे