पिरियड -आर यू रेडी टू फ्लाय
पॅडमॅन हा 'अरूणाचलम मुरूगनाथम' यांच्या जीवनावर आधारीत मसाला फिल्म मागील वर्षी प्रदर्शित झाली.महिलांना सेनेटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावं यासाठी पॅडमशीन बनवण्याच्या कार्यासाठी त्यांना प्रसिद्धी मिळाली.चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली. अगदी याच 'मासीक पाळी' विषयावर दिल्लीहून अगदी काही अंतरावर असलेल्या हापुर जिल्ह्यात इराणीयन दिग्दर्शिका रायका जेहताबजी यांनी दिग्दर्शीत केलेला "पिरीयड एन्ड ऑफ सेन्टेन्स" हा माहीतीपट बनतो आणि डाॅक्युमेट्री शाॅर्ट सब्जेक्ट या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पटकावत इतीहास रचतो.भारतीय मिडीयानं या चित्रपटाच कौतुक केल,काही ठिकाणी फटाके वाजवले गेले, मिठाई वाटली,थोडक्यात काय तर देशाच्या धर्तीवर बनलेला चित्रपट प्रसिद्ध असा ऑस्कर पटकावतो ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद ठरते. पण जरा उघड्या डोळ्याने विचार केला,तर हा चित्रपट भारतीय समाज मानसीकतेच्या कानफाडात मारतो हे अगदी सहज लक्षात येईल.
लाॅस एंजलीस देशातील ओकूड स्कूलमधील विद्यार्थीनी मासीक पाळी या समस्येचा प्रगत देशांतील आढावा घेतात.
यामुळे स्त्रीयांच्या दैनंदीन आणि मुलींना शैक्षणीक जीवनात येणाऱ्या अडचणी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत.जगभर स्त्री शिक्षणासाठी काम करणाऱ्या 'गर्ल लर्न ऑर्गनायजेशन'च्या मदतीने या विद्यार्थिनी भारतातील अशाच एका सेवाभावी संस्थाशी संपर्कात येतात. या सर्व खटाटोपीत त्यांच्या शिक्षीका मेलीसा मर्टन या मार्गदर्शन करतात.मर्टन आणि सर्व मुली पैसे गोळा करून दिल्लीहून काही अंतरावर असलेल्या हापुर जिल्ह्यात स्वस्तात सेनेटरी नॅपकीन बनवणार पॅड भेट देतात.'मासीक पाळीचा प्रश्न एवढ्यानेच संपेल का?' या समस्येवर जनजागृती करणारा एखादा माहितीपट बनवला तर नक्कीच फायदा होईल, असा विचार मेलीसा यांच्या मनात येतो.हा लघुपट बनवण्यासाठी इराणीयन दिग्दर्शिका रायका झेहताबजी यांना गळ घातली जाते. आणि इथेच ऑस्करच्या पटलावर नाव कोरलेला पिरीयड एन्ड ऑफ सेन्टेन्स हा माहितीपट जन्म घेतो.
मासीक पाळी आल्यावर मेडीकलमधून सेनेटरी पॅड आणायची लाज वाटते.कारण आजूबाजूला पुरूष असतात.दोन महीला देखील पिरीयड्स विषयी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अशी परिस्थिती असताना हापुर जिल्ह्यातील प्रोजेक्ट चालू असलेल्या परीसरातील महीलांना पडद्यावर आणायच काम हा माहितीपट करतो.मुलींना वर्गात पिरीयड्स संदर्भात प्रश्न विचारला तर त्या धड बोलू शकत नाही.शेतात,घरात राबणाऱ्या महीलांचा हशा पिकतो.देवामुळच अशुद्ध रक्त येत असल्याची धक्कादायक कबुली काही महीला देतात.शाळेत असताना पाळीचा त्रास झाल्यावर शिक्षण सोडाव लागल्याची कबुली महीला करते तेव्हा अंगावर काटा फुटतो.
अशा वेळी सेनेटरी नॅपकीन प्रोजेक्ट मध्ये काम करून पोलीस खात्यात रूजू होण्याच स्वप्न पाहणारी स्नेहा, संसाराला हातभार लावणारी सुमन आणि प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या इतर स्त्रीया यावर मनमोकळे बोलायला आणि सॅनेटरी नॅपकीनचा वापर करायला हातभार लावताना या माहितीपटातून दिसतात.इतर कंपनीची पॅड दिसायला आकर्षक असली तरिही हे खिशाला खर्चीक आणि परीणामकारक नसतात यापेक्षा अगदी वाजवी दरात या प्रोजेक्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेल पॅड मात्र तुलनेन अगदी प्रभावी ठरतं.हे गावोगावी महीलांना प्रात्यक्षीक दाखववून समजावलं जात.पॅडमॅन ज्या चित्रपटावर आधारला होता त्या अरूणाचालम मुरूगनाथम यांचीही आपल्या "भारत शंभर टक्के सेनेटरी नॅपकीन वापरणारा देश" बनवण्याच स्वप्न असल्याच या माहितीपटातून स्पष्ट केल यावेळी पुरूषांच्या नजरेतूनही या समस्येकडेही बघण्यात 'पिरीयड'यशस्वी ठरतो.

विशेष म्हणजे या पॅडच नाव FLY ठेवण्यात आल असून,अनेक महीलांच्या आयुष्यात नक्कीच यामुळे सकारात्मक बदल घडून येतील असही माहितीपटातील स्नेहाला वाटत.स्त्रीयांच राहणीनमान प्रथा,परंपरा आणि बदल स्वीकारत असलेला समाजही अगदी तरल पद्धतीने या माहितीपटातून उलगडून दाखवला गेलाय.साधी सरळ सिनेमेटोग्राफी सोबतच बॅगराऊंड स्कोर माहितीपटाला जीवंत करतो.सध्या सगळीकडे देशभक्तीची लाट पसरली असताना,'एक पाऊल पुढे टाकत मासीक पाळी विषयीची मनातली जळमट जाळून टाकून आई बहीण मैत्रीण बायको प्रेयसी अगदी मनमोकळेपणाने या विषयावर आपल्याशी बोलू शकतील'अस विश्वासाच वातावरण तयार करणं आपल्याच हातात आहे.जर अस झाल नाही तर, ओकूड स्कूलच्या विद्यार्थिनी,रायका जेहताबजी,अरूणाचलम मुरूगनाथम आणि या प्रोजेक्टचा भाग असलेल्या प्रत्येकाची मेहनत शून्य ठरेल हे वेगळ सांगायची गरज भासणार नाही ......
या मोहीमेला हातभाथमर लावण्यासाठी www.thepadproject.org या संकेतस्थळाला भेट द्या ....
शुभम काकडेे