तू अन मी....
सायन्सच्या पुस्तकातली
भलीमोठी नाव धडाधड माझ्या
तोंडावर मारून
तू कन्सेप्ट क्लिअर करतेस,
आम्ही मात्र काॅलेज समोर
एखाद्या रंगाचा झेंडा हाती धरून
युथ कनेक्ट करत असतो
दगड उचलण्यासाठी.
तू 'IIT' पासून
' AMISS' पर्यंतच्या
सगळ्या परीक्षांचा दिवसरात्र
एक करून अभ्यास करतेस,
आम्ही मात्र कट्ट्यावर
बिडी आणि तंबाखूची
पारायण करतो.
तूला फरक नाहीच पडत
सर शिकवत नसतील तरिही
तू मात्र शिकत राहतेस
समजून उमजून घेत,
आम्ही मात्र फेसबुकवरचा
इतिहास वाचून निष्कर्ष काढतो
अभ्यासक बनतो
आपल्या जातीचा
उद्धार करण्यासाठी.
तू समाज कला संगीत
आणि साहित्यात
रमून जगण्याचा कॅनव्हास
भलामोठा करतेस,
आम्ही मात्र मेंदू बोन्साय करतो.
तू निरीक्षण करतेस
शोध लावतेस
विज्ञापासून तत्वज्ञान पर्यंत.
आम्ही इन्स्टावर फोटोसाठी
लोकेशन शोधत
कोलंबसचा आदर्श
उभा करतो.
तू जाॅब करतेस,
आम्ही बेरोजगार होत
कामधंदा शोधत
शहर पालथी घालतो.
तू आयुष्य समृद्ध करतेस.
तर आम्ही आमच्या
आयुष्यावर बलात्कार.
शुभम काकडे
सायन्सच्या पुस्तकातली
भलीमोठी नाव धडाधड माझ्या
तोंडावर मारून
तू कन्सेप्ट क्लिअर करतेस,
आम्ही मात्र काॅलेज समोर
एखाद्या रंगाचा झेंडा हाती धरून
युथ कनेक्ट करत असतो
दगड उचलण्यासाठी.
तू 'IIT' पासून
' AMISS' पर्यंतच्या
सगळ्या परीक्षांचा दिवसरात्र
एक करून अभ्यास करतेस,
आम्ही मात्र कट्ट्यावर
बिडी आणि तंबाखूची
पारायण करतो.
तूला फरक नाहीच पडत
सर शिकवत नसतील तरिही
तू मात्र शिकत राहतेस
समजून उमजून घेत,
आम्ही मात्र फेसबुकवरचा
इतिहास वाचून निष्कर्ष काढतो
अभ्यासक बनतो
आपल्या जातीचा
उद्धार करण्यासाठी.
तू समाज कला संगीत
आणि साहित्यात
रमून जगण्याचा कॅनव्हास
भलामोठा करतेस,
आम्ही मात्र मेंदू बोन्साय करतो.
तू निरीक्षण करतेस
शोध लावतेस
विज्ञापासून तत्वज्ञान पर्यंत.
आम्ही इन्स्टावर फोटोसाठी
लोकेशन शोधत
कोलंबसचा आदर्श
उभा करतो.
तू जाॅब करतेस,
आम्ही बेरोजगार होत
कामधंदा शोधत
शहर पालथी घालतो.
तू आयुष्य समृद्ध करतेस.
तर आम्ही आमच्या
आयुष्यावर बलात्कार.
शुभम काकडे
