चौकीदार ही पिनोशिओ है.....

    चौकीदार ही पिनोशिओ है.....



गिरीश कुबेर यांचा एक लेख वाचनात आला.'पिनोशिओ पॅरेडाॅक्स'या संकल्पनेवर तो आधारीत होता.
जरा शब्द बोजड वाटत असला तरिही संकल्पना खुप साधी आहे.इटालियन लेखक कार्लो कोलादी यांची 'एडव्हान्चर्स ऑफ पिनाशिओ' ही कादंबरी लहान मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय बनलीय.या कादंबरीत पिनोशिओ नावाच कॅरेक्टर दाखवण्यात आलय.थापा मारणार आणि खोड्या काढणार असा हा अवलिया असतो.गंमत म्हणजे पिनोशिओने एखादी थाप टाकली की त्याच्या नाकाची लांबी वाढत असते.सांगण्याचा भाग एवढाच की यावर आधारीत एक गंमतीचा किस्सा घडलाय."पिनोशिओ पॅरोडॅक्स इन्डेक्स"नावाचा अहवाल नुकताच वाॅशिग्टन पोस्ट या वर्तमानपत्रान जाहीर केला.यामध्ये जगभरातील सर्वाधीक थापा मारणाऱ्या लोकांची यादी काढण्यात आली. नेहमीप्रमाणे वादातीत असणारे डोनाल्ड तात्या या अहवालात अव्वल स्थानावर आहेत.माणसासाठी अन्न वस्त्र निवारा जशा मुलभूत गरजा बनल्या आहेत त्याचप्रमाणे 'थापा मारणे' ही जणू डोनाल्ड तात्यांच्या आयुष्याचा जीवनावश्यक भाग बनून गेलीय असो.गंमतीचा भाग सोडला तर या पिनोशिओ निर्देशांकाचा असा भन्नाट वापर करणारे कार्लो कोलादी यांच कौतुक कराव तेवढ कमीच......

     समजा जर या थापा मारणाऱ्या लोकांची यादी भारतात काढायची ठरली तर काय गंमत येईल ना!असा विचार करतानाच मनात नकळत काही चेहरे झळकून गेले.'थापालाॅजी' हा जणू या राज्यकर्त्यांच्या पीएचडी विषय ठरेल .बर डोनाल्ड यांच्या थापा कशाही असल्या तरी त्या जमिनीवरच्या असतात पण भारतातील राजकीय धूरंधरांच्या थापा विज्ञान तत्वज्ञानाच्या सगळे मुलभूत सिदधांताचेच कपडे फाडतात.

 यामध्ये मोदींची 'अच्छे दिन' आणि राहुलजींची बाल्यावस्थेतील 'गरिबी हटाओ'ची पिढीजात थाप असो की सुब्रमणीयम स्वामी आणि बिप्लब देव या वाचाळवीरांच्या गंमताशीर थापा असो.ही फक्त उदाहरण झाली असे शेकडो राजकारणी आपल्या आजूबाजूला पहायला मिळतीलच.
सध्या निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना ही थापा मारण्याची जणू स्पर्धाच सुरू झालीय की काय अशी शंकाही येते.राजसत्ता  पिढीजात संपत्ती असल्यासारख ही सगळी मंडळी थापा मारत असतात.सुज्ञ नागरिक म्हणून या भुलथापांना बळी न पडता संवैधानिक पद्धतीन या थापाड्यांना जागा दाखवण्याची संधी सर्वांना भेटतीय.नक्कीच या संधीच सोन करायच की नाही हे आपल्या हातात आहे. खऱ्या खोट्याची शहानिशा आणि तर्क न लावता "सच की बात" ऐवजी "मन की बात" वर आंधळी श्रद्धा ठेवणार्‍या नागरिकांच्या कृपाशिर्वादाने सध्या तरी "पिनाशिओ पॅराडाॅक्स" स्पर्धेत भारतात मुदीशेठ तरी निर्विवाद अव्वल असतील यात तिळमात्र शंका नाही.
या सगळ्याचा सारासार विचार केल्यास 'चौकीदार ही पिनोशिओ है' असा विरोधकांनी प्रचार केल्यास आश्चर्य वाटायला नको!


शुभम काकडे