कोरड आभाळ
कधीच न पिकणारा
काळ्या कापसाचा पुुंजका
अलगद पसरवला
जातो आभाळभर
ढग भरून आलेत
म्हणून अंगावरची
कातडी सावकाराकडं
गहाण ठेऊन
वांझोट्या मातीच्या गर्भाशयात भाकरीच इवलस स्वप्न
रूजवू पाहत होता तो.....
त्याला कदाचीत
माहीत नसाव,
त्याच्या भाकरीचा प्रश्न सुटणारा नव्हताच कधी आणि सुटणार देखिल नाही....
आभाळ ओल धरत नाही तोपर्यंत......
शुभम काकडे