मी वाट पाहतोय

         मी वाट पाहतोय

शांत हो समजेल तुलाही
आभाळ अजूनही स्वच्छ आहे
काळवंडून गेल म्हणून काय झाल
प्रकाश अजूनही येतोय पृथ्वीवर.
कित्येक लढाया झाल्या या मातीवर
ज्यांची नोंद देखील ठेवली गेली नाही
माणसांच्या बखरीत किंवा धर्मग्रंथात
मान्य करतो की आज भरून आलय थोडंसं तो बरसेल तरसेल माणुसकी बाटवण्यासाठी...
चिख्खल होईल
वाटा निसरड्या होतील
विचार घसरून पडतील.....
यानंतर तुला यावच लागेल
माणसांच्या  मनात सडलेली डबकी
स्वच्छ करण्यासाठी
नव्या युगाची किरणे घेऊन
येतोयस ना...
मी वाट पाहतोय...?

              शुभम काकडे