मुंबई दिनांक
अरूण साधू यांना पत्रकारिता करत असताना जवळून मुंबई पाहता आली अगदी फोरास रोडवरची रंडीचाळ,मलबार हिल्सच्या मन हेलावून टाकणार्या प्रशस्त इमारती,नरिमन पाॅईंटचा खळखळणारा समुद्र,मंत्रालयातून संपूर्ण महाराष्ट्र खिशात ठेवणारे सत्ताधारी,माणस ओकणारी चर्चगेट लोकल,गिरगाव कुंभारवाडा नागपाडा भायखळा परळ लालबाग दादर कुर्ला विक्रोळी अंधेरीच्या मरगळलेल्या कोमेजलेल्या दाट वस्त्या,फोर्टातल्या सुटाबूटातील पाॅश कामगार अशा या स्वप्ननगरीच्या नाना तर्हा 'मुंबई दिनांक' कादंबरीतून अरूण साधू अतिशय रंजक पद्धतीने मांडतात.
एका इंग्रजी वर्तमानपत्रात चिफ रिपोर्टर अय्यर,मंत्रालयात सामान्य क्लार्कची नोकरी करून आयुष्याला कंटाळलेला किशोर वझे,पॅट्रोलपंपावर साधी नोकरी करूनही पाच खोली ब्लाॅक घेणारा पानिटकर,घरातून पळून येत स्वतःच्या हिंमतीवर युनीयन लीडर पदावर नाव कमावणारा डी कास्टा आणि या सबंध राज्यावर बारिक नजर ठेऊन असणारे मुख्यमंत्री जीवाजीराव शिंदे या पात्रांभोवती ही कादंबरी फिरते.या कादंबरीतून मुख्य पाच कथानकांची वैयक्तिक आयुष्यातली घालमेल,प्रेम,वासना वगैरे भावना आणि यातून एकमेकांशी जुळलेले नाते विचित्रपणे जोडण्यात येते आणि इथेच कादंबरी काळजाचा ठाव घेऊन जाते.
स्मगलींग,राजारणातल्या कुरघोडी,कामगार चळवळी, पत्रकारितेची सद्यस्थिती, शिक्षण,नोकरीसाठीची फरफड,हॉटेल-माॅलमधला चंगळवाद,काळाबाजार,रंडीबाजार,कॅन्सरने तरफडणारी आतडी,लोकल्सच्या गर्दीतली हतबलता,चाळीतलं उजाड विश्व अशा शेकडो विषयांवर प्रकाश टाकतानाच मुंबई डोळ्यासमोर उलगड जाते.प्रत्येक पात्रातून आपल्याच आयुष्याची घुसमट वाचतोय की काय अस वाटायला लागतं.एका दिवसाची सुरवात होते आणि त्या दिवसाचा शेवट होताना कादंबरीचा शेवट होतो मात्र हा दिवस वेगवेगळ्या व्यक्तींच्या दिनक्रमाचा वेध घेतो.
शेवटी राजकीय कादंबरीचा उदय मराठीत 'मुंबई दिनांक' या कादंबरीच्या रूपाने झाला अस बोलल तर ते वावग ठरणार नाही एवढ मात्र नक्की............
नक्की वाचा
मुंबई दिनांक
( लेखक: अरूण साधू)
शुभम काकडे