काॅललीस्ट... भाग-१
शिवाजी आज लवकर उठला होता. चहा नाष्टा आॅफिस लंच प्रोजेक्ट अस एकूण चक्र डोक्यात चालू असताना तो पार थकून गेला होता.आयुष्यातला तोचतोचपणा काहितरी हटके, फँटसी, थ्रील, करूया अस वाटायच...
मात्र पहिल्यासारखा खमकेपणा राहिला नव्हता. लहानपणी आईच्या हातच्या भल्यामोठ्या भाकर्या वरपून धष्टपुष्ट नजरेत भरण्यासारखा शिवबा आता पार हाडकून गेला होता. लोकलमधून, काॅलेजमधून, बाजारात फेरफटका मारताना, तो फार अस्वस्थ व्हायचा... कुणितरी फसवेल,चिखलफेक करेल की काय अस उगाचच विचार डोक्यात आला की घाबराघुबरा व्हायाचा. त्यात त्याचा तरी काय दोष म्हणा.. "माणसाचा जनावर होताना तो उघड्या डोळ्यान पाहात होता" तर थोडस चिल मारायच म्हणून आज त्याच्या काॅलेजची गैंग जमवूया असा प्लॅन करून शिवाने काॅललिस्ट चेक केली आणि पहिला फोन लावला त्याच्या जीवलग दोस्त भिमाला.....
'भिमा' झोपडपट्टीच्या शेजारी रहायचा. लहानपणापासूनच जाम हुशार खस्ता काढून शिकला, मोठा झाला..
टायबुटातला साहेब झाला. पण घरादाराशेजारच्या गरिबाच्या पोरांनी शिकाव म्हणून अडल्यानडल्यांना मदत करायचा. त्यांची खाण्यापिण्याची सोय करून द्यायचा. बड्या सायबाची ओळख असल्यामुळे पुस्तक ,कापड, नोकरी त्यांना मिळवून द्यायचा. पण आता भीमा थकून गेला होता आपल्या गावाकडच्या खालच्या वस्तीत खाटशी पडून असतो. लोक आता त्याच्याकड ढुंकुणपण बघत नाही अडलनडल तर त्याच नाव पुढ करून वस्तीतली लोक मात्र पैशासाठी दारूपायी हिंडत असतात.....
भीमाचा फोन स्वीच्डऑफ थोड्या हताश मनानच शिवा दुसरं नंबर शोधू लागला अचानक एक नाव दिसल 'अहिल्या'.शिवा आणि भिमा यांची मैत्रिण. बक्कळ श्रीमंती होती मात्र साधेपणा तीच्या राहण्यातून आणि माणसांसाठीची तळमळ तिच्या कृतीतून दिसायची.पुढं जाऊन काहितरी MSW करायचं अस फिक्स करून अडल्यानडलेल्यांना पैशांची मदत करायची. माणसांसाठी झटायची. काॅलेजनंतर ती कुठेशी गायब झाली होती. मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये तीच नाव कोणत्या तरी शिक्षणसंस्थेला देऊ करायचयं अस शिवानं पेपरात वाचल होत. शेवटी कंटाळून अहिल्या राजकारणात गेली असल अस वाटल होत पण तीचा फोन लागत नव्हता शिवा वैतागला त्यान शेवटचा फोन करायचा ठरवला लागलातर ठीक नाहीतर प्लॅन कट करून ऑफिसवर जायच अस ठरवून काॅललीस्ट उघडून शिवा 'मुहम्मदचा' नंबर शोधू लागला मात्र त्याचा नंबरच तो सेव्ह करायला विसरून गेला होता....
कदाचीत भीमा आणि अहिल्या मिसकाॅल मेसेज बघून समजून तरी जातील की शिवा आठवण काढत होता पण मुहम्मदच काय...?
तो केव्हाच विसरून गेला असेल मला ? तो मला ओळखणार देखील नाही ?
शेवटी हताश मनानं शिवबा ऑफिसला निघाला... जाताना गर्दीत मुहम्मद सारखा मिळताजुळता चेहरा दिसेल म्हणून शिवा चेहर्यापलीकडची कधी न उलगडलेली माणसं शोधू लागला.......
#क्रमश:
शुभम काकडे